🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मणिपूर महिला अत्याचार निषेधार्थ सांगलीत महिलांचा प्रचंड मोर्चा

मणिपूर महिला अत्याचार निषेधार्थ सांगलीत महिलांचा प्रचंड मोर्चा

सांगली दि. 24  : मणिपूर मध्ये काही समाजकंटकांनी महिलांची विवस्त्र धिंड काढून सामुदायिक बलात्काराचे घृणास्पद कृत्य केले आहे. यामध्ये कारगिल युध्दात पराक्रम गाजवलेल्या सैनिकाच्या पत्नीवरही अत्याच्यार झाला आहे. तीन महिने उलटूनही केंद्रातले मोदी सरकार व मणिपूर राज्य सरकार मुक गिळूण गप्प आहे. याप्रकरणी कोणतीही कायदेशीर कारवाई केली नाही. नरेंद्र मोदी व अमीत शहा हे निवडणूका आणि विरोधी राज्य सरकारे पाडण्यात मश्गुल आहेत हे अत्यंत घृणस्पद व निंदणीय आहे. या विरूध्द आज सांगलीतील सर्व पक्ष, संघटना व महिला आघाडया रस्त्यावर उतरून, काळया फिती बांधुन व हातात निषेध फलक धरून केंद्र व मणिपूर राज्य सरकारचा जाहिर निषेध केला.


सांगलीच्या कॉग्रेस भवन पासून स्टेशन चौकातील महात्मा गांधी पुतळयापर्यत सांगली शहर जिल्हा कॉग्रेस कमिटी, कॉग्रेस महिला आघाडी, राष्ट्रवादी कॉग्रेस महिला आघाडी, शिवसेना ठाकरे गट, संभाजी ब्रिगेड महिला आघाडी, शेतकरी कामगार पक्ष, जिजाउ ब्रिगेड, युवकका्रती दल, सांगली जिल्हा श्रमीक महिला संघटना, घेभरारी महिला ग्रुप, घरेलु कामगार विविध महिला संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या. महिलांवर अत्याच्यारास प्रोत्साहन देणा-या मोदी व मणिपूर राज्य सरकारचा धिक्कार असो, अत्याचार करणा-यांना कठोर शासन करा, धर्मनिर्पेक्षता व संविधानाचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणुन गेला या वेळी विविध महिला आघाडीच्या पदाधिका-यांनी केंद्र व मणिपूर राज्य शासनाचा धिक्कार करणारी भाषणे केली. यावेळी महिला आघाडी, सामाजिक संघटना व सर्व पक्ष यांच्या वतीने जिल्हाधिकारी सांगली यांना निवेदन देण्यात आले.  

यावेळी बोलताना आशा पाटील म्हणाल्या, मणिपूर विषयी या सरकार बद्दल जितकी घृणा व्यक्त कटावी तितकी कमी आहे. भाजप सत्तेत आल्यापासून महिलांच्याबाबतीत सगळीकडे दूषित वातावरण आहे, ज्या महिला खेळाडूंनी देशासाठी पदके आणली, त्यांनाच कुचलण्याचे काम या सरकारने केलं आहे, मणिपूर विषयी मोदी सरकरला उत्तर द्यावे लागेल."

लिलावती जाधव म्हणाल्या " अत्यंत चिड आणणाऱ्या या प्रकाराची जगभर निंदा झाली, त्यानंतर कुठे पंतप्रधानांना 36 सेकंद बोलण्यासाठी जाग आली. भाजप सरकार आटोपींनाच पाठीशी घालत आहे. गेले तीन महिने तिथे हिंसाचार उसळलेला आहे, त्यात शेकडो महिलांच्यावर सामुहिक अत्याचार झाला आहे. शेकडो लोकांना गोळ्या घालून ठार केलेले आहे. त्याकडे ना पंतप्रधानांनी लक्ष दिले, ना गृहमंत्र्यांनी ते निवडणुकीच्या चिंतेत आहेत." प्रा. नंदा पाटील म्हणाल्या, "आरएसएसची विचारसरणी ही महिलांच्या विरोधात असते, अनादी काळापासून महिलांवर हे प्रथम हल्ला करतात, मणिपूर राज्यात असणारी निसर्गसंपन्नता आपल्या उद्योजक मित्रांच्या घशात घालण्यासाठी निघालेला हा भस्मासुर आता गडायला हवा." असेही त्या म्हणाल्या.

ज्योती अदाटे म्हणाल्या, "मणिपूरमध्ये हजारोच्या संख्येने आलेल्या झुंडीने दोन महिलांना निर्वस्त्र करून त्यांची धिंड काढली आणि नंतर त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला. यातील एक महिला तर कारगिल युद्धामध्ये शीर्य गाजवलेल्या जवानाची पत्नी आहे. या घटनेला 79 दिवस उलटून गेले तरी त्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खबरबातही नाही म्हणे. केंद्रातल्या भाजप सरकारचेच हे वस्त्रहरण आहे." पृथ्वीराज पाटील म्हणाले, मणिपूर घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. भारतभरात संतापाची लाट उसळली आहे. लज्जास्पद घटनेमुळे हिंसाचारानं पेटलेल्या मणिपुरात संतापाचा भडका उडाला आहे.  आरोपी नराधमांना फाशी द्या अशी मागणी या मोर्चामधुन करीत आहोत.

यावेळी पृथ्वीराज पाटील, क्रांती कदम, किर्ती देशमुख, नुतन पवार, रोहिणी पाटील, आरती वळवडे, पुष्पलता पाटील, कांचन कांबळे, मालन मोहिते, छाया जाधव, रेखा पाटील, ज्योती काटकर, तेजस्वीनी सुर्यवंशी, पद्मीनी जाधव, माणसी भोसले, शोभा पवार, अमृता सरगर, वंदना सुर्यवंशी, शकुंतला हिंगमीरे, प्रणीता पवार, नंदा पाटील, मिना शेजू, लीलाताई जाधव, गिता ठक्कर, सुमन पुजारी, संगिता शिंदे, जयश्री घोरपडे, शितल मोरे, सुप्रिया घाटगे, सुजाता भगत, ज्योती सावंत, जान्हवी पाटील, पुजा पाटील, उषा पाटील, रंजना पाटील, तृप्ती लवटे, नंदीनी जगताप, कमल शिर्के, विदया स्वामी, लिना यादव, ललीता घाडगे, राजश्री जाधव, कांचन पळसे, उषा पाटील, प्रियांका तुपलोढे, प्रणीता पवार, शेवंताताई वाघमारे, स्मिता माळी, सना मंगळवेढे, अतिया मणेरी, मनोरमा कुंभार, सपना जाधव, कमल शिर्के, विदया स्वामी, संतोष पाटील, आनंदा लेंगरे, नितीन चव्हाण, मयुरेश पाटील, सुधीर जाधव, रविंद्र वळवडे, युवराज शिंदे, नितीन पवार, डॉ. संजय पाटील, बाळासाहेब पाटील, अविनाश जाधव, प्रा. एन. डी. बिरनाळे, डॉ. विक्रम कोळेकर, अशोक रासकर, राहुल पाटील, भारती भगत, रूपाली काळे, स्मीता देसाई, उपस्थित होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.