🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

उपचारासाठी आलेल्या महिलेचा डॉक्टरने केला विनयभंग

उपचारासाठी आलेल्या महिलेचा डॉक्टरने केला विनयभंग


सांगली :  उपचारासाठी आलेल्या विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिरज तालुक्यातील बुधगाव येथे ही घटना घडली. याप्रकरणी डॉक्टरवर सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वसीम बाळासो चौगुले (रा. गणेशनगर, बुधगाव) असे त्या संशयिताचे नाव आहे. पीडिता मिरज तालुक्यातील आहे. पीडिता एका आजारावर उपचार घेण्यासाठी डॉ. चौगुले याच्याकडे उपचार घेत होत्या. संशयिताचे बुधगाव येथे आमिरा हॉस्पिटल आहे. उपचारादरम्यान संशयित आणि पीडितेची ओळख झाली. 

संशयिताने पीडितेशी मोबाईलवरून संपर्क साधला. त्यानंतर पीडितेने त्याचा क्रमांक ब्लॉक केला. त्यानंतर पीडितेच्या पतीस सर्व सांगण्याची धमकी डॉक्टरने दिली. तो बोलण्यासाठी पीडितेवर दबाव टाकत होता. नंतर संशयिताने पीडितेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. त्यानंतर पीडितेने सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संशयितावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.