🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

एक कोटीची फसवणूक झाल्याने संगणक अभियंत्याची आत्महत्या

एक कोटीची फसवणूक झाल्याने संगणक अभियंत्याची आत्महत्या


पुणे : गुंतवणुकीत फसवणूक झाल्याने एका संगणक अभियंत्याने  इमारतीच्या टेरेसवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना पुण्यातील खराडी भागात घडली आहे. त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुंतवणूकदारांची तब्बल 300 कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या अष्टविनायक फर्मच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 13 जुलै रोजी पहाटे पावणे चारच्या सुमारास घडली होती.

प्रभात शंभुप्रसाद रंजन (वय-46 रा. विठ्ठलनगर, खराडी) असे आत्महत्या केलेल्या संगणक अभियंत्याचे नाव आहे. याबाबत राजीव शंभुप्रसाद रंजन (वय-48 रा. झारखंड) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अष्टविनायक फर्मचे संचालक सेल्वा नाडर , प्रसाद शिंदे , सचिनकुमार (रा. जनदेव पथ, पाटणा), अजिंक्य लोखंडे (रा. रेव्हेरिया सोसायटी, वानवडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

प्रभात रंजन एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत कामाला आहेत. गुंतवणूक केल्यानंतर फसवणूक झाल्याने त्यांनी 13 जुलै रोजी पहाटे पावणेचारच्या सुमारास इमारतीतून उडी मारुन आत्महत्या केली. प्रभात रंजन यांनी आत्महत्या करणयापूर्वी लिहिलेली सुसाइड नोट पोलिसांनी जप्त केली. फसवणूक झाल्याने आत्महत्या केल्याचे त्यांनी चिठ्ठीत नमूद केले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभात रंजन हे खराडी येथे पत्नी व दोन मुलीसंह राहत होते. प्रभात यांनी आत्महत्या केल्याचे समजल्यावर फिर्यादी हे भावाच्या घरी गेले. त्यावेळी त्यांना ड्रॉव्हर मध्ये एक चिठ्ठी सापडली. अष्टविनायक फर्मचे संचालक सेल्वा नाडर व प्रसाद शिंदे यांनी फर्ममध्ये पैसे गुंतवण्यास सांगून जुलै 2021 मध्ये 90 लाख रुपये कर्ज काढण्यास सांगितले. हे पैसे त्यांनी फर्ममध्ये गुंतवले. फेब्रुवारी 2023 मध्ये नाडर हा कार्यालय बंद करुन पळून गेला. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सचिनकुमार याने एस एस एंटरप्राईजेस कंपनीत पैसे गुंतवल्यास चांगला नफा मिळवून देतो, असे सांगून 15 लाख रुपये घेतले. तसेच खोटी कागदपत्र तयार करुन फसवणूक केली. तर रंजन यांची मर्सिडीज कार अजिंक्य लोखंडे याने 7 लाख 50 हजार रुपयांना खरेदी केली. या व्यवहारात तीन लाख रुपये देऊन उर्वरित साडेचार लाख रुपये दिले नाहीत.

सर्व आरोपींनी मिळून रंजन यांची 1 कोटी 17 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केली. फसवणुक झाल्याने प्रभात रंजन यांनी नैराश्यातून आत्महत्या केली. त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. सहायक पोलीस निरीक्षक खांडेकर तपास करत आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.