🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'त्या क्लिपवर' कॅमेऱ्यासमोर बोलण्यास सोमय्याची दातखीळ बसली

'त्या क्लिपवर' कॅमेऱ्यासमोर बोलण्यास सोमय्याची दातखीळ बसली


भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करून नेत्यांना बदनाम करणारा भाजप नेता किरीट सोमय्याची आक्षेपार्ह क्लिप व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. सोमय्याच्या त्या क्लिपवरून त्याची सर्वत्र छी थू होत असून त्याच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे. दरम्यान मंगळवारी सोमय्याने या सेक्स स्कँडलबाबत पहिली प्रतिक्रीया दिली आहे. कायम प्रसिद्धी माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रीया देणाऱ्या सोमय्याची या प्रकरणी मात्र दातखिळी बसली आहे. त्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे.

'एका मराठी वृत्तवाहिनीवर माझी एक व्हिडिओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली. या निमित्ताने अनेक व्यक्तींनी माझ्यावर अनेक आरोप केले, आक्षेप घेतले आहेत. अशाप्रकारच्या अनेक व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध आहेत, असेही सांगण्यात आले आहे, येत आहे. मी अनेक महिलांवर अत्याचार केले, अनेक महिलांच्या तक्रारी आल्या आहेत आणि त्याच्या अनेक व्हिडिओ क्लिप आहेत, असेही दावे केले जात आहेत. तथापि माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अशा अत्याचार. झालेला नाही, हे मी याठिकाणी स्पष्ट करतो. त्यामुळे अशा सर्व आरोपांची आपण चौकशी करावी, अशी माझी आपणास विनंती आहे. ही व्हिडिओ क्लिप किंवा अन्य अशा व्हिडिओ क्लिप (जर कोणाकडे असल्यास किंवा प्रदर्शित झाल्यास) या सगळ्यांची सत्यता तपासावी आणि त्याची चौकशीही करावी, अशी मी आपणास विनंती करीत आहे.' अशी मागणी किरीट सोमय्या याने पत्रातून केली आहे.

व्हिडीओत नेमके काय?

व्हिडीओत किरीट सोमय्या उघडे-नागडे आहेत. झोपून अश्लील चाळे करताना दिसत आहेत. मध्येच त्यांचे व्हिडीओ चॅटिंगही सुरू असल्याचे व्हिडीओत पाहायला मिळत आहे. एका आलिशान रूममधील ही दृष्ये आहेत. असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाल्याचा दावा लोकशाही वाहिनीने केला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.