🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

देव्हाऱ्यातील चांदीच्या मुर्ती हातोहात लंपास करणाऱ्या वृध्द महिलेला अटक

देव्हाऱ्यातील चांदीच्या मुर्ती हातोहात लंपास करणाऱ्या वृध्द महिलेला अटक


सागंली: घरात शिरुन देव्हाऱ्यातील चांदीच्या मुर्ती हातोहात लंपास करणाऱ्या वृध्द महिलेला सांगली पोलीसांनी सोमवारी अटक करुन ३१ हजार ५०० रुपयांच्या चांदीच्या मुर्त्या हस्तगत केल्या. जिल्हा शासकीय रुग्णालयाजवळ एक वृध्द महिला संशयास्पद आढळली. 

पोलीसांनी तिला ताब्यात घेऊन महिला पोलीस कर्मचाऱ्याकडून झडती घेतली असता तिच्याकडे गणपती, लक्ष्मी, पिंड, शाळीग्राम याच्यासह ग्लास, वाटी या देवघरातील चांदीच्या वस्तू मिळाल्या. गेल्या आठवड्यात मिरजेतील शिवाजीनगर भागात उघड्या दारातून देव्हाऱ्यातील वस्तूंची चोरी झाली होती. ही चोरी केल्याची कबुली महिलेने दिली. अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव सुप्रभा मंडलीक (वय ७२ रा. पुराची शिरोली, ता. हातकणंगले) असून तिच्या विरुध्द कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे निरीक्षक सतिश शिंदे यांनी सांगितले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.