🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

टी शर्ट ट्रायल करत असताना तरुणीचा विनयभंग

टी शर्ट ट्रायल करत असताना तरुणीचा विनयभंग

पुणे :  तरुणी टी शर्ट खरेदी करुन त्याची ट्रायल घेत असताना दुकानातील तरुणाने तिच्याशी जवळीक साधत तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार कॅम्पमध्ये घडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मुकुंदनगर  येथील एका २० वर्षाच्या तरुणीने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. १७१/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी कैफ कलीममुल्ला शेख  (वय २४, रा. जुना बाजार, खडकी -  याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार महात्मा गांधी रोडवरील  नाज चौकाजवळील अशोक विजय कॉम्प्लेक्समध्ये गुरुवारी दुपारी १ वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ही आरोपीच्या दुकानात टी शर्ट खरेदी करण्यासाठी गेली होती. तिने एक टी शर्ट खरेदी केला. अंगात असलेल्या क्रॉप टी शर्टवर ती नवीन टी शर्ट ट्रायल करत होती. त्यावेळी दुकानातील कैफ शेख याने क्रॉप टी शर्ट वर येईल या बहाण्याने या तरुणीचा जवळ गेला. टी शर्ट धरण्याचा बहाणा करुन तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन त्याने केले. या घटनेनंतर तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली असून पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक मोकाटे  तपास करीत आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.