सतत इअरफोन्सचा वापर करता? तासाला कानात जमा होतील ७०० बॅक्टेरिया
आजकाल काहींना स्मार्टफोन आणि हेडफोनशिवाय जमत नाही. काही लोकं काम करत असताना, किंवा प्रवास करताना इअरफोन्स लावून आवडीची गाणी ऐकतात. किंवा मोबाईल फोनवर चित्रपट पाहण्यासाठी, यासह मोबाईल फोनद्वारे संवाद साधण्यासाठी हेडफोनचा वापर करतात. काही वेळेला लोकांना अंदाज नसतो, की आपण किती तास गाणी ऐकत आहोत. मात्र, तुम्हाला माहिती आहे का, जास्त वेळ इअरफोन्सचा वापर केल्याने, तासाभरात कानात ७०० पटीने बॅक्टेरियांची वाढ होते. ऐकून आश्चर्य वाटलं ना?
यासंदर्भात, ईएनटी स्पेशालिस्ट डॉ.संदीप अरोरा सांगतात, ''कोरोना या वैश्विक महामारीनंतर लोकांमध्ये मोबाईल फोन आणि हेडफोन वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. व्यक्तींसह लहान मुलांना देखील या गॅजेट्सची सवय लागली आहे. काही वेळेसाठी आपण हे उपकरणे वापरू शकता. मात्र, त्याचा अधिक वापर आरोग्यासाठी घातक ठरू शकते. मुख्य म्हणजे, इअरफोनमधून येणारा आवाज कानाच्या पडद्याला जवळून आदळतो. ज्यामुळे कानाच्या पडद्याला कायमची इजा पोहचू शकते.''
इअरफोन्समुळे होणारे नुकसान कानात वेदना
काही लोकांना मोठ्या आवाजात गाणी ऐकण्याची सवय असते. मात्र, अधिक वेळ इअरफोन वापरण्याची सवय कानासाठी घातक ठरू शकते. ज्यामुळे कानांच्या पडद्याला इजा पोहचू शकते.
मेंदू वर वाईट परिणाम
हेडफोन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स निर्माण करतात. याचा अधिक वेळ वापर केल्याने मेंदूवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे इअरफोन किंवा हेडफोन वापरताना, आपल्या आरोग्याची काळजी घ्या. तासंतास हेडफोन वापरल्याने कानात घाण जमा होते. एक तास हेडफोन वापरल्याने कानात ७०० पटीने बॅक्टेरिया जमा होते. जे कान आणि मेंदूच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. यामुळे कानात इन्फेक्शन, ऐकण्यात अडचण अशी समस्या छळू शकते.
कानात इन्फेक्शन
काही लोकं आपले हेडफोन दुसऱ्या व्यक्तींसोबत शेअर करतात. अशा स्थितीत इअरफोन स्पंजद्वारे बॅक्टेरिया आणि जंतू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जातात, ज्यामुळे कानात संसर्ग होण्याची शक्यता वाढते. हेडफोनचा वापर लिमिटेड करावा. कारण म्युसिकच्या मोठ्या आवाजामुळे कानाच्या कॅनलमध्ये दाब पडतो. ज्यामुळे अनेकदा चक्कर देखील येऊ शकते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.