टॉयलेट कांड नंतर पायाचे तळवे चाटायला भाग पाडले , 'गोलू गुर्जर हा बाप '.....
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये एका व्यक्तीला चालत्या वाहनात दुसऱ्या व्यक्तीच्या पायाचे तळवे चाटायला लावल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, मध्य प्रदेश पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.
सिधी येथील लघुशंकेच्या प्रकरणावरुन गदारोळ सुरु असतानाच ही घटना समोर आली आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, पीडित व्यक्ती आणि आरोपी ग्वाल्हेर जिल्ह्यातील डबरा शहरातील रहिवासी आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, पीडित व्यक्तीला दुसर्या व्यक्ती वारंवार थप्पड मारताना दिसत आहे, जो पीडित व्यक्तीला चालत्या वाहनात "गोलू गुर्जर बाप है" म्हणण्यास भाग पाडताना दिसत आहे.
दरम्यान, व्हिडिओमध्ये पीडित व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या पायाचे तळवे चाटताना दिसत आहे. पीडित व्यक्तीला असे करण्यास भाग पाडले जात असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. आरोपी पीडित व्यक्तीला वारंवार थप्पड मारताना आणि शिवीगाळ करतानाही व्हिडिओमध्ये दिसत आहे. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये आरोपी पीडित व्यक्तीच्या चेहऱ्यावर अनेक वेळा बूट मारताना दिसत आहे.दुसरीकडे, राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सांगितले की, 'या घटनेप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. डबरा उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक कुमार शर्मा म्हणाले की, "शुक्रवारी संध्याकाळी एका व्यक्तीला वाहनातून मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. व्हिडिओ क्लिप फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवली जात आहे.'मिश्रा म्हणाले की, पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) तरतुदीनुसार त्या व्यक्तीचे अपहरण करुन मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला, राज्यातील सिधी जिल्ह्यात एका आदिवासी तरुणावर लघुशंका करतानाचा व्हिडिओ समोर आला होता, ज्यामुळे प्रचंड संताप निर्माण झाला होता.तसेच, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मंगळवारी आरोपी प्रवेश शुक्लाला अटक करण्यात आली. 30 जून रोजी झालेल्या दुसर्या एका घटनेत, शिवपुरी जिल्ह्यातील वरखडी गावात अल्पसंख्याक समुदायाच्या सदस्यांनी काही मुलींची छेड काढल्याच्या संशयावरुन दोन दलित पुरुषांना मारहाण केली आणि त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड केला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.