🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राष्ट्रवादीच्या एन्ट्रीचा मंत्री गिरीश महाजन यांनाही फटका; महत्वाची दोन खाती गेली

राष्ट्रवादीच्या एन्ट्रीचा मंत्री गिरीश महाजन यांनाही फटका; महत्वाची दोन खाती गेली 


मुंबई:  राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. अखेर तेरा दिवसांनंतर महाराष्ट्र मंत्रिमंडळात फेरबदल झाले असून नव्याने दाखल झालेल्या राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर झाले आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खातेवाटप करताना भाजपच्या मंत्र्यांकडे असणारी सहा खाती आणि शिंदे गटाकडे असलेली तीन खाती राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या अजित पवार गाटाला देण्यात आली आहेत. यामध्ये भाजपचे गिरीश महाजन यांनाही फटका बसला आहे. त्याच्याकडे असलेल्या तीन खात्यांपैकी दोन खाती काढून राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडे सोपविण्यात आली आहेत. महाजन यांच्याकडे आता एकाच खात्याची जबाबदारी राहिली आहे.

मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण अशी तीन महत्वाची खाती होती. नव्या मंत्रिमंडळ फेरबदलात यातील दोन खाती राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना देण्यात आली आहेत. वैद्यकीय शिक्षण हे खाते आता हसन मुश्रीफ यांच्याकडे देण्यात आले आहे. तसेच क्रीडा आणि युवक कल्याण हे खाते राष्ट्रवादीचे नवे मंत्री संजय बनसोडे यांच्याकडे देण्यात आले आहे. त्यामुळे आता गिरीश महाजन यांच्याकडे ग्रामविकास व पंचायत राज हे एकमवे खाते राहिले आहे. मात्र दोन खाती गमावल्यानंतर महाजन यांच्याकडे नवी जबाबदारी देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.