अजित पवार यांची चौकशी सुरूच राहील, शिंदे गटाच्या नेत्याने दिला सूचक इशारा
मुंबई : केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकार मंत्रिमंडळाचाही विस्तार लवकरच होणार आहे. प्रत्येकाची इच्छा असते की त्यांनी एक दिवस मंत्री व्हावे आणि लोकांचे प्रतिनिधित्व करावे.
मी देखील पंधरा वर्षे सभागृहामध्ये कामकाज पाहिलेले आहे. जवळून बघितलेले आहे. त्यामुळे जर मला मंत्रिपदाची संधी मिळाली तर मी त्या संधीचे सोनेच करेन. पण, नाही मिळाली तरी देखील काही हरकत नाही. मंत्रिमंडळात माझा समावेश आहे असे जर मंत्री दीपक केसरकर म्हणत असतील तर त्यावर मी काय बोलणार? त्यांना कोणी माहिती दिली हे मला माहित नाही. पण, जर ते म्हणत असतील तर ही चांगली बाब आहे, असे शिंदे गटाच्या नेत्याने स्पष्ट केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
