Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कर्मवीर पतसंस्थेने सभासदांचा विश्वास संपादन केला :- श्री. रावसाहेब पाटील कोथळी शाखा प्रशस्त वास्तुत स्थलांतर प्रसंगी काढले उद्गार

कर्मवीर पतसंस्थेने सभासदांचा विश्वास संपादन केला :- श्री. रावसाहेब पाटील कोथळी शाखा प्रशस्त वास्तुत स्थलांतर प्रसंगी काढले उद्गार


कोथळी :- कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सांगली च्या कोथळी ता. शिरोळ येथील शाखेचे प्रशस्त वास्तुत स्थलांतर संस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांचे अमृतहस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते.

स्वागत व प्रास्ताविकात चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी संस्थेच्या अर्थकारण. प्रगती तंत्रज्ञान ग्राहकसेवा समाजसेवा या क्षेत्रात केलेल्या कार्याचा आढावा घेतला. त्यांनी संस्थेच्या सांपत्तीक स्थितीची माहिती दिली. संस्थेचे संपुर्ण कामकाज ऑनलाईन कोअर बँकींग असून संस्थेच्या ठेवी ९०७ कोटी असून कर्ज वाटप रु. ६६० कोटी, भागभांडवल ३० कोटी ५० लाख आहे. स्वनिधी रु.८८ कोटी गुंतवणुक ३७८ कोटी आहे. तर संस्थेचा एकूण व्यवसाय २००० कोटी कडे वाटचाल करीत आहे. संस्थेस सतत ऑडीट वर्ग अ आहे. संस्थेची सभासद संख्या ५८००० आहे. संस्थेने नेहमी ग्राहक सेवेला अग्रक्रम दिल्याचे त्यांनी सांगितले.


संस्थेने सभासदांचे हित जोपासून कर्मवीर आण्णांचे विचार आत्मसात केल्याचे त्यांनी नमुद केले. कर्मवीर पतसंस्था सामान्यांचे संसार उभे करण्याचे काम करीत आहे. कर्मवीर पतसंस्था सहकारामध्ये आदर्श ठरेल असा आशावाद त्यांनी या प्रसंगी व्यक्त केला. या प्रसंगी कोथळी शाखेचे सल्लागार श्री. धनगोंडा बाळगोंडा पाटील श्री. दिलीप भाऊसो पाटील, श्री. गौतम बाबुराव इंगळे, श्री. संतोष विजयकुमार उपाध्ये श्री. विपुल कुबेर नांद्रे, श्री. बाहुबली बाबुराव इसराणा, श्री. शितल दिनकर पुजारी यांचा सत्कार करण्यात आला.


यावेळी पंचायत समिती सदस्य श्री. राजगोंडा नेमगोंडा पाटील, श्री. बाळासो जिन्नाप्पा दांड श्री. अनंत प्रभू चुडाप्पा, श्री. धनंजय जिन्नाप्पा मुदकाना, सुरगोंडा बाळगोंडा पाटील, श्री. बंडू भाऊ हाळे . एस. टी. पाटील, संजय बाबुराव मगदूम रावसाो भिमा बुर्ले, गजेंद्र बोरगांवे, श्री. भिमगोंडा बोरगांवे श्री. प्रकाश पुजारी, श्री. देवगोंडा पाटील यांचेसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमास संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉ. अशोक आण्णा सकळे संचालक अॅड. एस. पी. मगदूम डॉ. रमेश वसंतराव ढबू. श्री. ए. के. चौगुले (नाना ) श्री. वसंतराव धुळाप्पाण्णा नवले. डॉ. एस. बी. पाटील (मोटके) तज्ञ संचालक श्री. लालासो भाऊसो थोटे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल श्रीपाल मगदूम यांच्यासह संस्थेचे सभासद सेवक व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते. आभार संस्थेचे संस्थेचे संचालक श्री. वसंतराव धुळाप्पाण्णा नवले यांनी मानले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.