🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दाबेली विक्रेत्याचा खून; चौथ्या संशयितास अटक

दाबेली विक्रेत्याचा खून; चौथ्या संशयितास अटक


कुपवाड, ता. २३ : यशवंतनगर परिसरातील शुभम संतोष माने (वय २२, अभयनगर, संजयनगर) या दाबेली विक्रेत्याच्या खूनप्रकरणी पोलिसांनी चौथ्या संशयितास कुपवाड पोलिसांनी गुरुवारी (ता. २०) अटक केली. रमेश नामदेव रूपनर (२७, चौथी गल्ली, निरंकार कॉलनी, संजयनगर) असे त्याचे नाव आहे. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास चार दिवसांची पोलिस कोठडी दिली. पोलिसांनी माहिती दिली, की शुभमचा कुपवाडच्या यशवंतनगर चौकात दाबेली विक्रीचा गाडा होता.

कर्नाटक येथील देवीच्या यात्रेनिमित्त देवदर्शनासाठी तो गेला होता. तिकडून परतून येत असताना घोडागाडी शर्यतीतून त्याचा प्रतीक वगरे यांच्याशी वाद झाला. वाद तात्पुरता मिटवण्यात आला होता. त्यानंतर मे महिन्यात शुभम व प्रतीकचा याच विषयावरून संजयनगर येथे वाद झाला होता. त्याचाच राग मनात धरून तसेच शुभम हा आपला काटा काढेल याचा धसका घेत आपणच त्याचा बंदोबस्त करूया, असा विचार प्रतीकने केला. आपले दोघे साथीदार संशयित यश सौदडे व चिंतामणी गुडसलमनी ऊर्फ कांबळे या दोघांसह प्रतीक ९ जूनला शुभमच्या गाड्यावर दाबेली खाण्याच्या बहाण्याने आला. 

ग्राहकाप्रमाणे प्रतीकने दाबेली ऑर्डर केली. शुभम हा गाड्यावर दाबेली बनवीत असतानाच त्याच्यावर यश व प्रतीक दोघांनी सोबत आणलेल्या धारदार शास्त्राने हल्ला चढवला. हल्ल्यात चेहरा, डोके, छातीवर वर्मी वार झाल्याने शुभम हा रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. प्रकारानंतर दुचाकी चालक चिंतामणीसह तिघे ठिकाणाहून पसार झाले. कुपवाड व संजयनगर पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेतील शुभमला उपचारासाठी लोकांनी रुग्णालयात दाखल केले. मात्र डोक्यावर वर्मी वार बसल्याने त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी तपासाला तत्काळ गती देत काही काळातच तिघा संशयितांना अटक केली. तपासात खुनात आणखी एक संशयित रमेश रुपनर सहभागी असल्याचे स्पष्ट झाले. तो पोलिसांच्या हाती लागला नाही. त्याच्या अटकेसाठी पोलिसांचे प्रयत्न सुरूच होते. गोपनीय माहितीनुसार रुपनर गुरुवीरी सकाळी संजयनगर येथे येणार असल्याची माहिती मिळाली. छापा टाकून त्यास अटक करण्यात आली. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास चार दिवसांची कोठडी दिली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.