Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

टिकली लावली म्हणून शिक्षिकेने थोबाडीत मारलं; विद्यार्थिनीने केली आत्महत्या

टिकली लावली म्हणून शिक्षिकेने थोबाडीत मारलं; विद्यार्थिनीने केली आत्महत्या


झारखंडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. धनबाद येथील एका मुलीने आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यामागचे कारण धक्कादायक आहे. दहावीतील विद्यार्थीनी शाळेत जाताना कपाळावर टिकली लावून गेली होती. शाळेतील शिक्षिकेने यावर आक्षेप घेत सगळ्यांसमोर तिच्या थोबाडीत लगावली. या घटनेमुळे सगळ्यांसमोर अपमानित झाल्यासारखे वाटल्याने घरी आल्यानंतर तिने गळफास लावून घेत, आत्महत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत विद्यार्थीनी तेतुलमारी पोलीस ठाणे हद्दीतील सेंट झेवियर्स शाळेमध्ये शिकत होती. सोमवारी शाळेत जाताना तिने टिकली लावली होती. प्रार्थने दरम्यान शिक्षिकेने टिकली लावण्याचे कारण विचारले असता या विद्यार्थीनीने उलट उत्तर दिले, त्यामुळे शिक्षिकेने तिला मारले, मात्र कॉनवेंट शाळेत टिकली लावून आल्याने शिक्षिकेला राग आला आणि म्हणून तिने मुलीला मारले असल्याचा आरोप मृत मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे. शिक्षिकेच्या वागण्यामुळे विद्यार्थीनी इतकी दुखावली गेली की घरी पोहोचताच गळफास लावून घेत स्वत:चे आयुष्य संपविले. पोलिसांना तिच्या गणवेशामध्ये सुसाईड नोट सापडली आहे.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित शिक्षिकेवर कारवाई करण्यात यावी यासाठी, मृत मुलीचे नातेवाईक आणि गावातील लोक मृतदेह घेऊन शाळेसमोर आंदोलनाला बसले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी शिक्षक आणि मुख्याध्यापकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणाचा शोध घेत आहेत व चौकशीनंतरच योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सांगितले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.