🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जोधपूर हादरलं; गुन्हेगारांनी ६ महिन्याच्या बाळालाही ठार केलं

जोधपूर हादरलं; गुन्हेगारांनी ६ महिन्याच्या बाळालाही ठार केलं


जोधपूर: राजस्थानच्या जोधपूर परिसरात बुधवारी सकाळी खळबळजनक हत्याकांड समोर आले. ओसिया तालुक्यातील रामनगर गावात एकाच कुटुंबातील ४ लोकांची निर्दयी हत्या करण्यात आली. या घटनेत ६ महिन्याच्या चिमुरडीलाही गुन्हेगारांनी सोडले नाही. कुटुंबातील प्रमुख व्यक्ती, त्याची पत्नी, सून आणि नाती यांची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. इतक्यावर गुन्हेगार थांबले नाही तर त्यांनी सर्व मृतदेह एका खोलीत ठेवून त्याला आग लावली.

प्राथमिक तपासानुसार, गुन्हेगारांनी घराबाहेर झोपलेल्या दाम्पत्याचा गळा चिरला. त्यानंतर झोपडीत जाऊन सून आणि नातीलाही मारून टाकले. रामनगरच्या पुनाराम यांच्या घरी हे हत्याकांड घडले. ६० वर्षीय पुनाराम आणि त्यांची ५५ वर्षीय पत्नी भंवरी देवी दोघेही घराबाहेर खाटीवर झोपले होते. त्यांची सून धापू आणि ६ महिन्याची नात मनिषा झोपडीत झोपले होते. भल्या पहाटे कुणीतरी घराबाहेर झोपलेल्या दाम्पत्याची हत्या केली. त्यानंतर झोपडीत असणाऱ्या सून-नातीला संपवले. त्यानंतर सर्व मृतदेह झोपडीत टाकून त्याला आग लावली. आगीचा धूर पाहता गावकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. आगीवर नियंत्रण मिळाल्यानंतर चौघांचे मृतदेह पाहून हे हत्याकांड समोर आले.

या घटनेची माहिती मिळताच तातडीने पोलीस घटनास्थळी पोहचले. ४ जणांच्या हत्याकांडाने परिसरात खळबळ माजली. जोधपूर जिल्हाधिकारी हिमांशु गुप्ता, ग्रामीण एसपी धर्मेंद सिंह यांनीही घटनास्थळी धाव घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, पुनारामला दोन मुले आहेत. हत्याकांडावेळी दोघेही घरात नव्हते. एक शेतावर काम करण्यासाठी गेला होता तर दुसरा मुलगा अन्य गावात गेला होता. सध्या पोलिसांनी संशयाच्या आधारे जवळच्यांची चौकशी करत आहे. लवकरच या हत्याकांडातील आरोपींचा शोध घेतला जाईल असा विश्वास पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.