बंद घरे फोडणाऱ्या चोरट्यास अटक, तीन लाखांचा मुद्देमाल जप्त
सांगली: जिल्ह्यातील भिलवडी, तुंग, वसगडे येथील बंद घरे फोडून त्यातील ऐवज लुटणाऱ्यास अटक करण्यात आली. त्याच्याकडून तीन लाखांचे चोरीचे दागिने, तीन मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्याकडून चार गुन्हे उघडकीस आणण्यात यश आल्याचे एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी सांगितले.
आयार् दिगंबर भोसले (वय २०, रा. कारंदवाडी, ता. वाळवा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिस अधीक्षक डॅ. बसवराज तेली यांनी चोरीच्या गुन्ह्यातील संशयितांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार निरीक्षक श्री. शिंदे यांनी खास पथक तयार केले होते. पथकाला संशयित भोसले चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी यपाचवा मैल येथे येणार असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली.पथकाने तेथे सापळा रचून भोसले याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्याजवळ दागिने आढळले. त्याबाबत पथकाने त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने त्याचे मित्र तुषार काळे, बोक्या काळे, करण काळे यांनी मिळून भिलवडी, तुंग, वसगडे येथील बंद घरे फोडून तेथून दागिने चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याला भिलवडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मागर्दशर्नाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, उपनिरीक्षक विशाल येळेकर, कुमार पाटील, मच्छिंद्र बडेर्, सागर टिंगरे, सोमनाथ गुंडे, रोहन घस्ते, विक्रम खोत, बिरोबा नरळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.