शिंदेगट राज्यकर्ता पक्ष नाही, त्यांच्यात अन् अजित पवार यांच्या गटात जमीन आसमानचा फरक- संजय राऊत
ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. शिंदेगट हा काही राज्यकर्ता पक्ष नाही, असा घणाघात त्यांनी केला आहे. शिवाय अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात जमीन आसमानचा फरक असल्याचंही संजय राऊत म्हणालेत.
अजित पवारांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य नाही. पण शिंदे गट आणि अजित पवारांनामध्ये खूप फरक आहे. शिंदे गटाला किती महत्व आहे हे स्पष्ट झालं आहे. त्यांचं महत्व फक्त शिवसेना फोडण्यासाठीचं होतं. आता शिंदे गटाचं महत्व संपलं आहे, असा घणाघात संजय राऊतांनी केला आहे.
‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी अजिज पवार आज नाशिकमध्ये आहेत. त्यावर संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. यावेळी बोलताना ‘अलोकप्रिय’ असा त्यांनी उल्लेख केला आहे. अलोकप्रिय नेत्यांच्या सभेसाठी जशी माणसं आणली जातात, तसं शासकीय कार्यक्रमासाठीही लोकांना आणलं जात आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम राबवावा लागत असेल, हे सरकार जनतेच्या मनातलं नाही. हा जनतेचा कार्यक्रम नाही, जबरदस्तीने माणसे आणली जात आहेत अजित पवार हे रेल्वेने नाशिकला आले आहे. रस्त्यात खड्डे असल्यामुळे ते रेल्वेने आले आहेत, असं संजय राऊत म्हणालेत. आम्हीही अडीच वर्षांपूर्वी कुटनिती केली होती. ती शिंदेगटाला मान्य झाली नाहीत, असंही ते म्हणालेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
