Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महागड्या स्पोर्ट्स सायकली चोरणाऱ्यास अटक दीड लाखांच्या 11 सायकल जप्त

महागड्या स्पोर्ट्स सायकली चोरणाऱ्यास अटक दीड लाखांच्या 11 सायकल जप्त


मिरज :  मिरज शहर परिसरातून महागड्या स्पोर्ट्स सायकल चोरणाऱ्यास अटक करण्यात आली. त्याच्याकडून दीड लाख रुपये किमतीच्या 11 सायकल जप्त करण्यात आल्या आहेत. महात्मा गांधी चौक पोलिसांनी ही कारवाई केली.

रावसाहेब तानाजी पाटील (वय 43, रा. सावळी, ता. मिरज) असे अटक केलेल्याचे नाव आहे. मिरजेचे पोलिस उपअधीक्षक प्रणिल गिलडा यांनी चोरीतील संशयितांना पकडण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार महात्मा गांधी चौक पोलिसांचे पथक गस्त घालत होते.

मिरजेत एकजण संशयास्पदरित्या महागडी स्पोर्ट्स सायकल घेऊन जाताना पथकाला दिसले. पथकाने त्याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केल्यानंतर त्याने 11 सायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्याला अटक करून सायकल जप्त करण्यात आल्या. उपअधीक्षक गिलडा यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सुधीर भालेराव, उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे, धनंजय चव्हाण, सूरज पाटील, प्रवीण हुक्कीरे, जावेद शेख, विनोद चव्हाण आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.