Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सुनेची अब्रू वाचवण्यासाठी सासू धावली

सुनेची अब्रू वाचवण्यासाठी सासू धावली

14 ऑगस्ट रोजी उत्तर प्रदेशातील बदायूंमधील बिलसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या तेजेंद्र नावाच्या 42 वर्षीय व्यक्तीची रात्री घराबाहेर गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा छडा लावत पोलिसांनी मृत व्यक्तीच्या पत्नीला खुनाच्या आरोपाखाली अटक केली आहे. तेजेंद्र सागर याची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेली कुऱ्हाडही पोलिसांनी जप्त केली आहे.

पोलिसांनी या गुन्ह्याबाबत माहिती देताना सांगितले की तेजेंद्र याची त्याच्या सुनेवर वाईट नजर होती. ही बाब तेजेंद्रच्या पत्नीला कळाली होती आणि दोघांमध्ये यावरून बरेचदा वाद होत होता. अनेक वेळा समजावूनही तेजेंद्र सुधारत नव्हता. तेजेंद्रच्या मुलाचे 2 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. माल ओलांडून सून घरी आली तेव्हापासून तेजेंद्र तिच्यावर डोळा ठेवून होता.

मध्यरात्री केला खात्मा

बिलसी पोलीस स्टेशन हद्दीतील मोहल्ला क्रमांक 8 मध्ये राहणारा तेजेंद्र हा उकाड्यामुळे घराबाहेर झोपला होता. दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह सापडला होता. मध्यरात्री त्याचा खून करण्यात आला होता. झोपेत असतानाच तेजेंद्रचा खून झाल्याची माहिती कळताच आसपासच्या परिसरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांना याबाबत कळवल्यानंतर त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. तपासादरम्यान धक्कादायक बाबी पोलिसांना समजत गेल्या.


14 ऑगस्टच्या रात्री काय घडलं?

पोलीस तपासात मृत तेजेंद्रची पत्नी मिथिलेश हिचेही नाव संशयितांच्या यादीत होते. मिथिलेशची पोलिसांनी कसून चौकशी केली असता तिने सांगितले की तिचा पती तेजेंद्र तिला रोज मारहाण करायचा. त्याची सुनेवरही वाईट नजर होती. मिथिलेश या सगळ्याला कंटाळली होती. तिने हा प्रकार कायमचा बंद करण्याचा निश्चय केला होता. तिने घरातल्या कुऱ्हाडीला आधीच धार लावून घेतली होती. पहाटे तीन वाजेच्या सुमारास तेजेंद्र गाढ झोपेत असताना तिने कुऱ्हाडीने वार करत त्याला ठार मारून टाकले असे सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ ओपी सिंह यांनी सांगितले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.