Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

झोपेत सर्पदंश होऊन शाळकरी मुलीचा मृत्यू

झोपेत सर्पदंश होऊन शाळकरी मुलीचा मृत्यू 


सागंली: झोपेत असताना सर्पदंश झाल्याने तिसरीमध्ये शिकणाऱ्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना सावळज येथे बुधवारी पहाटे घडली.

सावळज (ता. तासगाव) येथील कु. प्रांजल प्रमोद माळी (वय ८) या मुलीचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी रात्रीच्या ११ च्या सुमारास राहत्या घरात विषारी सापाने प्रांजलला दंश केला. मात्र सर्पदंश झाल्याची तिला लवकर जाणीव झाली नाही. मात्र काही वेळाने त्रास होऊ लागल्याने तिला उपचारासाठी सावळज येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु प्रांजल अधिकच अत्यवस्थ असल्यामुळे तिला पुढील उपचारासाठी सांगलीला हलविण्यात आले. दरम्यान, सांगलीत अधिक उपचार सुरु होण्यापुर्वीच प्रांजलचा मृत्यू झाला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.