Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तेजस ठाकरे आणि टीमला मोठे यश; सह्याद्रीच्या पर्वत रांगेत आढळली सापाची नवी प्रजात

तेजस ठाकरे आणि टीमला मोठे यश; सह्याद्रीच्या पर्वत रांगेत आढळली सापाची नवी प्रजात


मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे आणि त्यांच्या टीमनं सापाच्या आणखी एका नव्या प्रजातीचा शोध लावला आहे. सापाची ही नवी प्रजात सह्याद्री पर्वत रांगांमध्ये आढळून आली आहे. सह्याद्रीओफिस असं या सापाच्या नव्या प्रजातीला नाव देण्यात आलं आहे. दरम्यान या आधीही तेजस ठाकरे यांनी 11 हून अधिक दुर्मिळ वन्य प्रजातींचा शोध लावून त्यांना ओळख मिळून दिली आहे.दरम्यान 2014 मध्ये तेजस ठाकरेंनी पालीची एक नवी जात शोधली. 

तेजस ठाकरे यांचा पालीवरील शोधनिंबध आंतरराष्ट्रीय मासिक असलेल्या 'झुटाक्सा'मध्ये प्रसिद्ध झाला आहे. त्यानंतर तेजस ठाकरे यांनी पश्चिम घाटामध्ये सापाची एक नवी प्रजात देखील शोधली आहे. सापासोबतच त्यांनी गोड्या पाण्यातील खेकड्यांच्या एका नव्या प्रजातीचाही शोध लावला आहे. वन्यजीव संवर्धानासाठी त्यांचं काम सातत्यानं चालू आहे. तेजस ठाकरे यांनी आतापर्यंत खेकडे, मासे, पाली अशा 11 हून अधिक दुर्मिळ वन्य प्रजातींचा शोध लावला आहे.आता पुन्हा एकदा त्यांनी सापाच्या आणखी एका नव्या प्रजातीचा शोध लावला आहे. सापाची ही नवी प्रजात सह्याद्री पर्वत रांगांमध्ये आढळून आली आहे.'सह्याद्रीओफिस' असं या सापाच्या नव्या प्रजातीला नाव देण्यात आलं आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.