Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भारतात ' या' गावात शिट्या मारून एकमेकांना देतात आवाज, काय आहे कारण?

भारतात  ' या' गावात शिट्या मारून एकमेकांना देतात आवाज, काय आहे कारण?


जगभरात प्रत्येक व्यक्तीची महत्त्वाची ओळख म्हणजे त्याचं स्वतःचं नाव असतं. एकमेकांना आवाज देताना सर्वजण नावाचाच उपयोग करतात. त्यामुळे नावासोबत व्यक्तीचं खास नातं असतं. जन्मताच पालक आपल्या मुला-मुलींचं नामकरण करतात आणि एक सुंदर असं नाव ठेवतात. जन्मापासून मृत्यूपर्यंत माणूस त्याचं नाव सोबत घेऊन जातो. मात्र भारतात असं एक गाव आहे जिथे एकमेकांना नावानं हाक मारत नाही. हे गाव कोणतं आहे आणि यामागे काय कारण आहे याविषयी जाणून घेऊया.भारतात एक गाव आहे जिथे एकमेकांना नावानं आवाज दिला जात नाही.

एकमेकांना शिट्ट्या मारुन हाक दिली जाते. पुरुष, महिला एकमेकांना शिट्ट्या मारुनच बोलावतात. या गावात प्रत्येकजण शिट्टी वाजवून हाक मारतो. प्रत्येकासाठी वेगळ्या आवाजाची शिट्टी असते.

म्हणजेच जेवढे लोक तितक्याच प्रकारच्या शिट्ट्या इथे वाजवल्या जातात.1 तास काम करुन तरुण कमावतो कोट्यवधी रुपये, काय आहे प्रकरण?हे अनोखं गाव भारतातील मेघालयमध्ये आहे. पूर्व जिल्ह्यातील खासी हिलचं कांगठाण गाव येथे आहे. या गावाला व्हिसलिंग व्हिलेज असंही म्हणतात. या गावात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची दोन नावे आहेत.

एक सामान्य नाव आणि दुसरे म्हणजे शिट्टीची धून. या गावात जेव्हा कोणी जन्म घेतो तेव्हा त्याच्या नावाचा वेगळा सूर लावला जातो. प्रथम आई त्याला धून ऐकवते. त्यानंतर, हळूहळू मूल त्याच्या नावाची धून ओळखतो आणि त्याच ट्यूनवर प्रतिक्रिया देऊ लागतो.दरम्यान, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की याठिकाणी सर्वजण एकमेकांना शिट्ट्या का मारतात? खरं तर हे गाव डोंगरांनी वेढलेलं आहे. अशा स्थितीत जेव्हा शिट्टी वाजवली जाते तेव्हा त्याचा डोंगरातून प्रतिध्वनी येतो आणि दूरपर्यंत ऐकू येतो. शास्त्रज्ञही या पद्धतीला योग्य म्हणतात. मूल जन्माला येताच.

पक्ष्यांच्या किलबिलाटानुसार हे लोक नवे सूर काढतात. आता या गावातील लोकही तंत्रज्ञानाचा आधार घेऊ लागले आहेत. त्यांच्या नावाची धून ते मोबाईलमध्ये सेव्ह करतात. कागदपत्रांवर प्रत्येक व्यक्तीचे एक सामान्य नाव देखील आहे. पण हाक मारायला शिट्टी वाजवली जाते.

https://ekaro.in/enkr20230827s32841707

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.