ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं निधन
मुंबई, 24 ऑगस्ट : ज्येष्ठ मराठी अभिनेत्री सीमा देव यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं. दिवंगत अभिनेते रमेश देव यांच्या पत्नी आणि अजिंक्य देव यांच्या त्या आई होत्या. सीमा देव यांना अल्झायमरचा त्रास होता.
अनेक मराठी चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात रमेश देव यांचे निधन झाले.चार वर्षांपूर्वी सीमा देव यांना अल्झायमर झाल्याची माहिती अजिंक्य देव यांनी दिली होती. सध्या त्यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांचे मुंभईतील राहत्या घरी निधन झाल्याची माहिती मिळाली आहे.
सीमा देव यांनी सरस्वतीचंद्र, आनंद, ड्रीम गर्ल या हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं होतं.१९५७ मध्ये आलिया भोगासी या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. लग्नाआधीचं नाव नलिनी सराफ असं होतं. रमेश देव यांच्याशी लग्नानंतर त्यांचे नाव सीमा देव झालं. ८० हून जास्त चित्रपटांमध्ये सीमा देव यांनी अभिनय केला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
