लक्ष्मी मंदिर परिसरातील हातगाड्या महापालिकेने हटविल्या
सांगली मिरज आणि कुपवाड महानगर पालिकेकडून अतिक्रमणविरोधी मोहीम गतिमान करण्यात आली आहे. शुक्रवारी कुपवाड आयुक्त सुनील पवार यांच्या आदेशाने आणि उपायुक्त राहुल रोकडे यांच्या सुचनेनुसार कुपवाड फाटा परिसरातील हातगाड्या आणि अन्य शेडचे अतिक्रमने हटवण्यात आली. आज सोमवारी पथकाने लक्ष्मी मंदिर कुपवाड रोड ते पैलवान सोसायटी मार्गावरील अनधिकृत हातगाड्या हटविल्या.
प्रभाग 3 च्या अंतर्गत येणाऱ्या प्रभाग 9 मधील लक्ष्मी मंदिर परिसरातील 10 ते 12 विनापरवाना हातगाड्या आणि छोटे मोठे फलक पथकाने हटविले. सहायक आयुक्त उज्वला शिंदे आणि अतिक्रमण विभागाचे विशेष कार्य अधिकारी दिलीप घोरपडे आणि अतिक्रमण पथकाकडून ही कारवाई करण्यात आली. यामध्ये नव महाराष्ट्र हायस्कूलच्या पिछाडीस विनापरवाना लावण्यात आलेल्या हातगाड्या आणि त्याच्या आजूबाजूला उभारण्यात आलेले छोटेमोठे शेड पथकाने हटवून लक्ष्मी मंदिराचा परिसर हातगाडे आणि अतिक्रमण मुक्त केला. या कारवाईत प्रभाग 3 चे सर्व स्वच्छता निरीक्षक तसेच अतिक्रमण विभागाचे विक्रम घाडगे आदींनी सहभाग घेतला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.