चकमक! अजितदादा - एकनाथ शिंदे यांच्यात जुपंली; फडणवीस यांना करावी लागली मध्यस्थी
शिंदे-पवारांमधील ही शाब्दिक चकमक गंभीर रूप घेऊ नये म्हणून अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी करावी लागली. राज्यातील मंत्र्यांची शुक्रवारी एक बैठक झाली. त्यात विविध मुद्दय़ांवर चर्चा सुरू होती. अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील मृत्यूंचा मुद्दा उपस्थित केला. तुमच्या ठाण्यात एवढे मृत्यू कसे, असा सवाल त्यांनी थेट मुख्यमंत्री शिंदे यांनाच विचारला. घटना गंभीर आहे, काळजी घेतली पाहिजे, असेही त्यांनी सुनावले. थेट मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्री भर बैठकीत जाब विचारतात हे पाहताच मिंधे गटाच्या मंत्र्यांनीही नाराजी व्यक्त केली.मुख्यमंत्री शिंदे यांनीही अजितदादांच्या प्रश्नाला उत्तर देत मृत्यूची कारणमीमांसा केली. रुग्णांचा मृत्यू कसा झाला? किती रुग्णांची प्रकृती गंभीर होती? शेवटच्या क्षणी रुग्णालयात किती रुग्ण आले? रुग्णालयावर येणारा कामाचा ताण याबाबत शिंदे यांनी अजित पवार यांना सांगितले. परंतु ते ज्या आवेशात सांगत होते ते पाहता आता शिंदे-पवारांमध्ये वादाची ठिणगी पडणार असे फडणवीस यांच्या लक्षात आले. त्यावर त्यांनी तातडीने हस्तक्षेप करत विषयाला बगल दिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.