Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

चहा प्यायल्याने दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू , आईच्या दाव्याने पोलीसही चक्रावून गेले

चहा प्यायल्याने दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू , आईच्या दाव्याने पोलीसही चक्रावून गेले 


चहा प्यायल्याने कुणाचा मृत्यू होऊ शकतो का? कदाचित तुमचं उत्तर नाही असेल. मात्र चहा प्यायल्याने एका दीड वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना मध्य प्रदेशच्या देवासमध्ये घडली आहे. चहा प्यायल्याने मुलाचा मृत्यू झाल्याचा दावा त्याच्या आई केला आहे. मुलाला चहा प्यायल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.

सिमरोल पोलिसांनी सांगितलं की, लहान मुलाचे वडील तुरुंगात असल्याने तो आपल्या आजोबांच्या घरी होता. मुलाच्या आईच्या म्हणण्यानुसार, चहा दिल्यानंतरच मुलाला अस्वस्थ वाटू लागले. प्रकृती बिघडल्याने त्यांनी त्याला इंदूरच्या चाचा नेहरू रुग्णालयात नेले. मात्र वाटेतच मुलाचा मृत्यू झाला. डॉक्टरांना दिलेल्या माहितीनुसार, मुलाला हॉस्पिटलमध्ये आणले तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. 

रुग्णालयाच्या डॉ. प्रीती मालपाणी यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, मुलाला रुग्णालयात मृतावस्थेत आणण्यात आले होते. त्यामुळे आम्ही मृत्यूच्या कारणावर भाष्य करू शकत नाही. मात्र एवढ्या लहान मुलाला चहा दिलाच का? असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. या बालकाचा मृत्यू खरंच चहा प्यायल्याने झालाय की दुसरं काही कारण आहे? या प्रकरणाच्या तळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.