Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तिकीट नाकारताच माजी उपमुख्यमंत्री ढसाढसा रडले

तिकीट नाकारताच माजी उपमुख्यमंत्री ढसाढसा रडले


हैद्राबाद : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेलंगणात राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी एकूण 119 जागांसाठी 115 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. ते स्वत: गजवेल आणि कामारेड्डी या दोन जागांवरून निवडणूक लढवणार आहेत.

यावेळी त्यांनी तेलंगणाचे माजी उपमुख्यमंत्री आणि घानपूर (स्टेशन) मतदारसंघाचे विद्यमान आमदार थातिकोंडा राजैया यांना उमेदवारी नाकारली. घानपूर मतदारसंघातून भारत राष्ट्र समितीने तिकीट नाकारल्यानंतर तेलंगणाचे माजी उपमुख्यमंत्री थातिकोंडा राजैया भावूक झाले. त्यांना कार्यकर्त्यांसमोरच रडू कोसळलं. आमदार राजैया यांचा रडतानाचा व्हिडिओ समोर आला असून, सोशल मीडियात राजैया यांच्या समर्थकांनी 'जय राजैया, जय वेळापत्रक अद्याप निवडणूक आयोगाने व्हायरल झाला आहे.


लैंगिक छळाचा आरोप

आमदार राजैया भावूक झाले व कार्यकर्त्यांसमोरच त्यांना रडू कोसळले. काही महिन्यांपूर्वी त्यांच्याच पक्षाच्या एका सरपंचाने राजैया यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. या आरोपामुळेच राजैया यांची उमेदवारी नाकारल्याचे बोलले जात आहे. तेलंगणा विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक अद्याप निवडणूक आयोगाने जाहीर केले नाही.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.