Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खाजगी रुग्णालयात एसीमुळे गारठून 2 नवजात बालकांचा मृत्यू; डॉक्टरला अटक

खाजगी रुग्णालयात एसीमुळे गारठून 2 नवजात बालकांचा मृत्यू; डॉक्टरला अटक 

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरला लागून असलेल्या शामली जिल्ह्यातील कैराना भागात एका खाजगी दवाखान्यात दाखल असलेल्या दोन नवजात बालकांचा रविवारी एअर कंडिशनरच्या थंडीमुळे गारठून मृत्यू झाला.
याबाबत पोलिसांनी माहिती दिली. कैराना पोलिस स्टेशनचे प्रभारी नेत्रपाल सिंह यांनी सांगितले की, मृत मुलांच्या कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे डॉ. नीतू यांच्या विरोधात अनावधानाने झालेल्या हत्येच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. 

दरम्यान, आरोग्य विभागाने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्वनी शर्मा यांनी रविवारी दिली. या संदर्भात पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, बसेरा गावातील रहिवासी नाझीम आणि कैराना येथील साकिब यांच्या दोन नवजात बालकांना शनिवारी स्थानिक खासगी दवाखान्यातील फोटोथेरपी युनिटमध्ये उपचारासाठी ठेवण्यात आले होते.

 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.