🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सर्प दंशाने विवाहितेचा मृत्यू; जत तालुक्यातील घटना



जत : जत तालुक्यातील सिध्दनाथ येथील शिंदे वस्ती जवळ सुनिता वसंत शिंदे (वय 30) या विवाहित महिलेस सर्प दंश झाल्याने तिचा शुक्रवारी पहाटे जत ग्रामीण रुग्णालयात निधन झाले.
मध्यरात्री एक वाजता नाग साप चावला.
यावेळी त्यांना तातडीने दोन वाजता जत येथील ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले. तपासणी नंतर डॉक्टरांनी मयत झाल्याचे घोषित केले. सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ग्रामीण रूग्णालय येथेच शवविच्छेदन करुन प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. 

या घटनेची नोंद जत पोलीस ठाण्यात झाली आहे. त्यांच्या पश्चात सासु सासरे व पती, दोन मुली असा परिवार आहे. निधन झाल्याची वार्ता कळताच गावातील नातेवाईक येऊन जत ग्रामीण रूग्णालयासमोर आक्रोश सुरू होता. पहाटे पाच पासुन ते सकाळी १० वाजेपर्यंत आक्रोश सुरूच होता. शवविच्छेदन झाल्या नंतर मृतदेह ताब्यात घेऊन गेल्यानंतरच आक्रोश कमी झाला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.