संपादकाला धमकी देणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करा - राज्य प्रवक्ते संतोष पाटील.
लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या दैनिकांच्या किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या संपादकास, पत्रकारास जर कोणी धमकी दिली तर त्यावरती कठोर कारवाई करण्याचे राज्य सरकारने आश्वासन दिले आहे, त्यासाठी कठोर नियमावली सरकारने तयार केली आहे त्या अनुषंगाने कुठल्याही दैनिकाच्या साप्ताहिकाच्या, मासिकाच्या, व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकार, संपादकस धमकी देणाऱ्यावर कारवाई करायची आश्वासनही केंद्र व राज्य सरकारने दिले आहे. वाळवा तालुका भाजपच्या युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याने दैनिक वाळवा क्रांतीचे संपादक गजानन शेळके यांना धमकी देऊन बघून घेण्याची भाषा केली आहे.
म्हणून आज आम्ही मराठा स्वराज्य संघाच्या वतीने सांगलीचे पोलीस अधीक्षक मा.बसवराज तेली साहेब यांना निवेदन देण्यासाठी भेटलो, त्यावेळेला त्यांना सर्व हकीगत सांगितली, परंतु त्यांनी निवेदन स्वीकारण्याचे टाळले म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्या कार्यालयात निवेदन देऊन पोहोच घेऊन आलो. या निवेदनात म्हटले आहे की भाजपच्या वाळवा तालुका युवा मोर्चाचे अध्यक्ष प्रवीण माने याने दैनिक वाळवा क्रांतीची संपादक गजानन शेळके यांना फोनवरून बघून घेण्याची धमकी दिली आहे या प्रकरणाची पूर्ण चौकशी करून गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आम्ही सांगलीचे पोलीस अधीक्षक मा.बसवराज तेली साहेब यांना भेटून सर्व हकीगत सांगितले आहे. या वेळेला अनमोल पाटील, सुशांत कदम,स्वप्नील शेटे, सागर बडोदेकर,निखिल सकटे, महिंद्र माने व अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
