🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अमेरिकन महिलेवर दिल्लीत बलात्कार

अमेरिकन महिलेवर दिल्लीत बलात्कार

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भारतीय वंशाच्या अमेरिकन महिलेवरील बलात्कार प्रकरणात एका खासगी कंपनीच्या सीईओविरोधात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला. सदर घटना दिल्लीच्या चाणक्यपुरी भागात मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात घडली होती.

एका खासगी कंपनीत कार्यरत असलेली ४२ वर्षीय पीडित महिला वर्षभरापूर्वी दिल्लीत आली होती. दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ती उतरली असता, तिच्याच कंपनीच्या सीईओने आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार पीडितेने पोलिसांकडे दाखल केली. पोलिसांनी महिलेची वैद्यकीय तपासणी केली असून सदर सीईओविरोधात गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.