Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली :- कारची ट्रॅक्टरला पाठीमागून धडक :, 1 जणं जागीच ठार, तर 4 जणं जखमी

सांगली :- कारची ट्रॅक्टरला पाठीमागून धडक :, 1 जणं जागीच ठार, तर 4 जणं जखमी 


जत : मोटारीने नांगरणीच्या ट्रॅक्टरला पाठीमागून धडक दिल्याने कारमधील राजन युवराज नायकवडी (वय २७, रा. ढोलेवाडी ता. बत्तीस शिराळा जि.सांगली) जागीच ठार झाला. तर चार जण जखमी झाले आहेत. ही घटना अमृतवाडी फाट्याजवळ जत पासून पाच किलोमीटर अंतरावर गुरुवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. मृत राजन हा बत्तीस शिराळाजवळील ढोलेवाडी येथील असून जत येथे आशीर्वाद गोल्ड लोन येथे कामाला होता.

नांगरणीच्या ट्रॅक्टरला पाठिमागून कार क्रमांक (एमएच १४ एफएस ०७७०) ने मध्यरात्रीच्या सुमारास धडक दिली. या अपघातात कारमधील राजन हा ठार झाला. तर चारजण जखमी झाले असून दोघांची प्रकृत्ती चिंताजनक आहे. गंभीर जखमी असलेल्या दोघा रुग्णांवर मिरजेच्या सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर दोघांच्या वर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

विजय उर्फ बंडू कृष्णदेव सांगोलकर (वय ४५, रा. मंगळवेढा), गणेश गायकवाड (२६, रा. आटपाडी), आकाश व्हनमाने (२३, रा. सोलापूर), प्रदीप स्वामी (२३ रा. जत) अशी जखमींची नावे आहेत. घटनास्थळी जाऊन जत पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला आहे. मोटारच्या चालकाने मद्यपान करून गाडी चालवल्याने हा अपघात घडला असावा असा जत पोलिसांचा अंदाज आहे. मयत राजन याच्या पश्चात आजी, आजोबा, आई, वडील, एक बहिण असा परिवार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.