Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अपक्ष खासदार विशाल पाटीलांचीं इंडियाला साथ :, काँग्रेसचा 100 वा खासदार

अपक्ष खासदार विशाल पाटीलांचीं इंडियाला साथ :, काँग्रेसचा 100 वा खासदार 


नवी दिल्ली/सांगली:  महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीला भरभरुन मतांचे दान दिले. त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भात भाजपचा धुव्वा उडाला. तर पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेत राहिलेली जागा आणि रंगलेली लढत ही सांगलीची होती. सांगलीच्या जागेवरुन महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची वेळ आली होती. काँग्रेसचे विशाल पाटील यांनी मुंबईसह दिल्लीतील नेत्यांच्या भेटीगाठी घेत उमेदवारीसाठी आग्रही भूमिका घेतली होती. मात्र महाविकास आघाडीत सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गटाला सोडण्यात आली आणि विशाल पाटलांना बंडखोरी करत निवडणूक लढवावी लागली. 
विशाल पाटील यांचा सांगलीतून दणदणीत विजय झाला. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांकडून त्यांचे जोरदार स्वागत झाले. त्यांनीही काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीला पाठिंबा जाहीर केला. आज विशाल पाटील यांनी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली. यावेळी विश्वजीत कदमही त्यांच्यासोबत होते.

विशाल पाटलांची इंडिया आघाडीला साथ
सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी इंडिया आघाडीला साथ देण्याचे पत्र काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंना दिले तर दिल्लीश्वरांनीही त्यांचा 'हात' विशाल पाटलांसोबत असल्याची ग्वाही दिल्याचे म्हटले जाते. विशाल पाटील यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन त्यांना समर्थनाचे पत्र दिले आहे. तांत्रिकदृष्ट्या विशाल पाटील हे अपक्ष खासदार आहेत.

सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी विश्वजीत कदम हे आग्रही होते. त्यासाठी त्यांनी काँग्रेस नेत्यांसह महाविकास आघाडीच्याही नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. सांगलीच्या जागेचा घोळ आघाडीत कायम राहिला. जागावाटपाआधीच शिवसेना ठाकरे गटाने येथून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी घोषित केली होती. अखेर विशाल पाटील यांना बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवावी लागली. लिफाफा चिन्हावर त्यांनी निवडणूक लढवत भाजपचे खासदार संजय पाटील यांचा दणदणीत पराभव केला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.