Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्र हादरला! 14 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार; मुलांच्या वसतिगृहात नेलं अन्...

महाराष्ट्र हादरला! 14 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार; मुलांच्या वसतिगृहात नेलं अन्...

अकोला : अकोल्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी अकोल्यात तिघांना अटक करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलीला फसवून तिला मुलांच्या वसतिगृहात नेण्यात आलं. त्यानंतर तिच्यावर सलग तिघांनी सामूहिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. अकोला शहरातल्या रामदास पेठ भागातील मुलांच्या वसतिगृहात हा प्रकार घडला आहे.

या प्रकरणात सिव्हिल लाईन पोलिसांनी पिडीत मुलीच्या कुटुबियांच्या तक्रारीवरुन या प्रकरणी गुन्हे दाखल केले आहे. अंकुश वक्ते, अनुराग चौधरी आणि दिपक मडावी असं अत्याचार करणाऱ्या तरुणांची नावं आहेत. तिघेही जण सद्यस्थित अकोला कारागृहात कैद आहेत. या घटनेने अकोला जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अकोला शहरातील 14 वर्षीय पीडित अल्पवयीन मुलगी खाजगी ट्यूशनला जाते म्हणून ती 7 जूनला घराबाहेर पडली. रात्री बराच वेळ झाला मुलगी घरी परत आली नाही, कुटुंबियांनी शोधाशोध केली. पण मुलीसंदर्भात कुठलाच सुगावा हाती लागला नाही. अखेर कुटुंबियांनी सिव्हिल लाईन पोलीस ठाण गाठलं आणि मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविण्यात आली.

अखेर मुलगी दुसऱ्या दिवशी म्हणजे 8 जूनला घरी परतली आणि आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार तिने कुटुंबियांनी सांगितला. तिने सर्व घटना सांगितल्यानंतर कुटुंबियांना मोठा धक्का बसला आणि नातेवाईकांनी पिडीतेसब पोलिस स्टेशन गाठलं आणि सामूहिक अत्याचार झाल्याची तक्रार दाखल केली.

नेमकं काय घडलं 7 ते 8 जूनच्या रात्री?

मिळालेल्या माहितीनुसार, 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी खाजगी शिकवणी क्लास जाण्यासाठी रस्त्याने जात असतानाच अंकुश नामक तरुण तिला जवळ आला अन् तिला फसवत, आमिष देत अकोला शहरातल्याच रामदास पेठ पोलिस स्टेशन हद्दीतील एका मुलांच्या वस्तीगृहात घेऊन गेला. दरम्यान अंकुश हा अकोल्यातील कौलखेड भागातील मूळ रहिवासी. मात्र त्याचाच मित्र वसतिगृहात राहत होता. दिपक चौधरी असे त्याचे नाव असून या तरुणाशी अंकुशची चांगली मैत्री आहे.

येथील वसतिगृहातल्या चौधरीच्या खोलीत तिच्यावर तिघांना सामूहिक अत्याचार केला, ही घटना 7 ते 8 जूनच्या रात्री घडली. अंकुश वक्ते, अनुराग चौधरी आणि दिपक मडावी या तिघांनी सामूहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार तिने बाल कल्याण अधिकाऱ्यांसमोर पोलिसांना सांगितला. अशी माहिती सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे यांनी दिली आहे. तिघांविरुद्ध बाल संरक्षण कायद्यांतर्गत तसेच अपहरण आणि अत्याचाराचे गुन्हे दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच काही वेळातच पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

वसतिगृहाच्या सुरक्षा प्रश्नावर ताशेरे?

अकोला शहरातील एका नामकिंत संस्थेच हे मुलांचं वसतिगृह असल्याची माहिती आहे, वसतिगृहात सुरक्षा अथवा वॉचमन आहे का? जर असेल तर घटनेवेळी कुठे होता?, एका मुलांच्या वसतिगृहात अल्पवयीन मुलीला नेत तिच्यावर सामूहिक अत्याचार होतोय. या घटनेनंतर वसतिगृह सुरक्षेविषयी प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकारांनंतर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.