Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शिक्षकाने एकतर्फी प्रेमातून छळले, 15 वर्षेय मुलींन घेतला गळफास :, डायरीत लिहलं, ' मम्मी मीं तुला सांगू शकले नाही '

शिक्षकाने एकतर्फी प्रेमातून छळले, 15 वर्षेय मुलींन घेतला गळफास :, डायरीत लिहलं, ' मम्मी मीं तुला सांगू शकले नाही '

एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलींनी गळ्याला गळफास लावण्याचा धक्कदायक प्रकार सुरुच असून आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिक्षकाच्या एकतर्फी छळाला कंटाळून 15 वर्षीय अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पोलिसांनी संशयित आरोपी शिक्षक अजय जयवंत सासवडेला अटक केली आहे. दौलताबाद पोलिसांकडून अटकेची कारवाई करण्यात आली. आत्महत्या केलेल्या अल्पवयीन मुलीच्या आईने दप्तर तपासल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे सासवडेच्या एकतर्फी प्रेमातून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. मुलीच्या डायरीमध्ये शिक्षकाचे नाव आढळून आले. तसेच मम्मी मी तुला सांगू शकले नाही असाही उल्लेख केला आहे.

अल्पवयीन मुलीला गेल्यावर्षीपासून त्रास
दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार अजय अल्पवयीन मुलीला गेल्यावर्षीपासून त्रास देत होता. त्यामुळे संबधित मुलीच्या कुटुबीयांना मुलीला शाळेतून काढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, शाळेतून समजूत घालण्यात आल्यानंतर निर्णय बदलला होता. मात्र, शिक्षकाकडून त्रास सुरुच होता. आईने मुलीचे दप्तर पाहिल्यानंतर त्यामध्ये एक घड्याळ आढळून आले. त्यामध्ये अजयचा फोटो होता. त्यामध्ये दोन पत्रेही आढळून आली. त्यामुळे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोपातून मुलीच्या आईने तक्रार दाखल केल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.