Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सलमानच्या फार्महाऊसवरून 24 वर्षांची तरूणी पोलिसांच्या ताब्यात, कारण ऐकाल तर..

सलमानच्या फार्महाऊसवरून 24 वर्षांची तरूणी पोलिसांच्या ताब्यात, कारण ऐकाल तर..

सलमान खानचे पनवेलचे फार्महाऊस बरंच फेमस आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून हे फार्महाऊस कोणत्या ना कोणत्या कारणामुळे बरंच चर्चेत आलं आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगरच्या गुंडानी तेथे रेकी रून सलमानवर हल्ल्याचा कट आखला होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली.

आता हे फार्महाऊस पुन्हा चर्चेत आलं आहे. कारण या फार्म हाऊसबाहेरून एका 24 वर्षीय तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची बातमी समोर आली आहे. यामुळे न सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. मात्र ती मुलगी कोण होती, त्यामुळे सलमानच्या जीवाला धोका आहे का असे अनेक प्रश्न सध्या लोकांना पडले आहेत.

खरंतर दिल्लीतील या 24 वर्षांच्या तरूणाने सलमान खानच्या पनवेल फार्महाउस बाहेर मोठा गोंधळ माजवला. त्या तरूणीच्या सांगण्यानुसार, ती सलमानची मोठी चाहती आहे. सलमानशी लग्न करायचं आहे असं सांगत ती चरूणी फार्महाऊसवर पोहोचली आणि त्याची भेट घेण्याचा हट्ट करू लागली. मात्र आसपासच्या लोकांनी तिचा हा गोंधळ फोनमध्ये रेकॉर्ड केला आणि लागलीच या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली.

फार्महाऊसवर सलमान होता का ?

दरम्यान ही घटना घडली तेव्हा दंबग स्टार काही त्याच्या पनवेलच्या फार्महाऊसवर नव्हता. रिपोर्ट्सनुसार, या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून त्यामध्ये भावूक झालेली ती तरूणी सलमानशी लग्न करण्याची इच्छा वारंवार व्यक्त करत होती. अखेर पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं आणि काऊन्सिलिंगसाठी तिला न्यू पनवेल येथील एका एनजीओमध्ये पाठवण्यात आलं.

त्या एनजीओच्या संस्थापकांच्या सांगण्यानुसार, त्या तरूणीची स्थिती गंभीर आहे. ती सलमान खानच्या पडद्यावरील प्रतिमेच्या प्रेमात आकंठ बुडाली आहे. तिला मानसिक उपचारांसाठी कळंबोलीतील एमजीएम रुग्णालयात गदाखल करण्यात आले. त्यानंतर दिल्लीतील तिच्या कुटुंबियांशी संपर्क साधून या घटनेची माहिती देण्यात आली. उपचारांनंतर तिला घरी पाठवण्यात येईल.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.