Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'या ' कुटूंबांना मिळणार वर्षाला 3 मोफत सिलेंडर, असे आहेत निकष

'या ' कुटूंबांना मिळणार वर्षाला 3 मोफत सिलेंडर, असे आहेत निकष 


राज्यातील मुलींना मोफत उच्च शिक्षण मिळण्याची घोषणा आज अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. त्याचबरोबर आज अर्थमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहिण योजना व पात्र कुटुंबाला मोफत तीन गॅस सिलिंडर देण्यात येणार असल्याची घोषणा केली.

महिलांसाठी या तीन योजना महत्त्वपूर्ण होत्या. गेल्या काही दिवसांपासून या योजनेबाबतची चर्चा सुरु होती. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन महिलांना खुश करण्यासाठी सरकारने शेवटच्या अर्थसंकल्पाता या घोषणा केल्या. राज्य सरकारने राज्यातील ५६ लाख १६ हजार महिलांसाठी वर्षाला तीन सिलेंडर मोफत देण्याबाबतच्या योजनेची घोषणा केली आहे. बीपीएल रेशनकार्ड असणाऱ्या महिलांना वर्षाला ३ सिलेंडरचे पैसे थेट खात्यात मिळणार आहेत. या माध्यमातून राज्यातील तब्बल ५६ लाख १६ हजार महिलांना याचा थेट फायदा होणार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.