Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अन.... एका चहामुळे वाचला 48 जणांचा जीव :, अंगावर काटा आणणारी बुलढाण्यातील घटना

अन.... एका चहामुळे वाचला 48 जणांचा जीव :, अंगावर काटा आणणारी बुलढाण्यातील घटना 


बुलढाण्यामधून मोठी बातमी समोर आली आहे. खासगी लक्झरी बसनं अचानक पेट घेतला. या घटनेत बस संपूर्णपणे जळून खाक झाली आहे. चिखली जवळील मेहकर फाटा येथे ही धक्कादायक घटना घडली. ही बस वऱ्हाड घेऊन चंद्रपूरवरून बुलढाण्याला निघाली होती. मात्र वाटेतच या बसनं पेट घेतला. या बसमध्ये एकूण 48 प्रवासी होते. बसला अचानक आग लागल्यानं घटनास्थळी एकच गोंधळ उडाला.

सुदैवाची बाब म्हणजे या घटनेत कोणतीही जिवीतहनी झालेली नाहीये. जेव्हा बसला आग लागली तेव्हा या बसमधील सर्व प्रवासी हे चहा पिण्यासाठी खाली उतरले होते. बस उभी असताना बसनं अचानक पेट घेतला. मात्र एकही प्रवासी बसमध्ये नसल्यानं मोठी दुर्घटना टळली. मात्र दुसरीकडे प्रवाशांचं सर्व सामान जळून खाक झालं आहे.

ही बस वऱ्हाड घेऊन चंद्रपूरवरून बुलढाण्याकडे निघाली होती. मात्र वाटेतच मेहकर फाट्याजवळ ही दुर्घटना घडली. प्रवासी चहा पिण्यासाठी उतरले असताना बसनं अचानक पेट घेतला. या घटनेत प्रवासी थोडक्यात बचावले आहेत. दरम्यान बसला आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये. मात्र शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली, परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. बस संपूर्णपणे जळून खाक झाली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.