Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अजितदादांनी बोलवलेल्या बैठकीला 4 आमदार गैरहजर :, राष्ट्रवादीत पुन्हा भूकंप

अजितदादांनी बोलवलेल्या बैठकीला 4 आमदार गैरहजर :, राष्ट्रवादीत पुन्हा भूकंप 


लोकसभा निवडणुकीच्या निकालात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची कामगिरी निराशाजनक झाली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीला फक्त एकच जागा जिंकता आली आहे, यानंतर अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसने आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे 4 आमदार गैरहजर आहेत.

राष्ट्रवादीच्या बैठकीला गैरहजर असलेल्या आमदारांमध्ये सुनिल टिंगरे, धर्मराव अत्राम, राजेश शिंगणे, नरहरी झिरवळ गैरहजर आहेत. अजित पवारांनी बोलावलेल्या या बैठकीला हे चार आमदार वैयक्तिक कारण सांगून गैरहजर आहेत. यापैकी नरहरी झिरवळ हे परदेशात आहेत. सुनिल टिंगरे हे आमदार पुण्यातल्या पॉर्शे कार अपघात प्रकरणामुळे चर्चेत आले होते.

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अजित पवारांसोबत असलेले 10 ते 12 आमदार पुन्हा एकदा शरद पवारांकडे परतू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली होती. सुप्रिया सुळे यांचा बारामती लोकसभा निवडणुकीत विजय झाल्यानंतर 10-12 आमदारांनी त्यांना शुभेच्छांचे मेसेज पाठवले. या मेसेजच्या मार्फत आमदार पक्ष वापसीसाठी प्रयत्न करत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

महाराष्ट्रात महाविकासआघाडीने तब्बल 30 जागा जिंकल्या तर महायुतीला फक्त 17 जागांवर यश मिळालं, तर सांगलीतून अपक्ष लढलेल्या विशाल पाटील यांचा विजय झाला. महाविकासआघाडीत काँग्रेसला 13, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 9 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 8 जागा मिळाल्या. दुसरीकडे महायुतीत भाजपला 9, शिवसेनेला 7 आणि राष्ट्रवादीला 1 जागा मिळाली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.