Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पंढरपूर-कराड मार्गावर भीषण अपघात :, ट्रकच्या धडकेत 5 महिलाचा जागीच मृत्यू

पंढरपूर-कराड मार्गावर भीषण अपघात :, ट्रकच्या धडकेत 5 महिलाचा जागीच मृत्यू 


पंढरपूर : सांगोला तालुक्यातील पंढरपूर-कराड मार्गावर भीषण अपघात झाला. यामध्ये भरधाव ट्रकने पाच महिलांना चिरडले. तर दोन महिला गंभीररित्या जखमी झाल्या आहेत. शेतातील कामे आटोपून या महिला घरी माघारी जात होत्या. त्यादरम्यान हा अपघात झाला.
पंढरपूर-कराड मार्गावर झालेल्या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सर्व पाच महिला सांगोला तालुक्यातील कटफळ गावच्या होत्या. मंगळवारी (दि.18) दुपारी चारच्या दरम्यान शेतातील काम करून घरी परतणाऱ्या 7 महिलांना एका ट्रकने चिरडले. यापैकी पाच महिलांचा मृत्यू जागीच झाला तर यामधील दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. सांगोला तालुक्यातील चिकमहुद गावातील बंडगरवाडी येथे हा अपघात झाला.

दरम्यान, या सर्व महिला कटफळ गावच्या असून, बंडगरवाडीतून कामावरून सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी गाडीची वाट बघत उभ्या होत्या. या दरम्यान कोळसा घेऊन जाणारा एक ट्रक समोरून आला आणि थेट महिलांच्या अंगावर गेला. ट्रकच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात घडला.

सातत्याने होताहेत अपघात
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पुण्यासह राज्यभरात अपघातांच्या घटना वाढल्या आहेत. एकट्या पुण्यात गेल्या महिन्याभरात 30 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. नागपूरमध्येही दोन दिवसांपूर्वी एका कारने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या 9 मजुरांना चिरडले होते. या सर्व प्रकरणांमुळे राज्यातील सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.