Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नागपूरमध्ये हिट ॲण्ड रन, फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडलं! दोघांचा मृत्यू, 6 जणांना अटक

नागपूरमध्ये हिट ॲण्ड रन, फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडलं! दोघांचा मृत्यू, 6 जणांना अटक

पुण्यातील पोर्शे कार हिट ॲण्ड रन प्रकरण ताजे असताना नागपुरात देखील असाच प्रकार समोर आला आहे. नागपुरात एका कार चालकाने मद्यधुंद अवस्थेत फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडल्याचा प्रकार घडला. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला. घटनास्थळावरुन कारचालक फरार झाला होता. पोलिसांनी तपासचक्र फिरवत या प्रकरणी कार चालकासह 6 जणांना अटक केली आहे.

याबाबात माहिती अशी की, सोमवारी मध्यरात्री 12.30 वाजल्यानंतर एक कर उमरेड रोडने नागपूरच्या दिशेने येत होती. दरम्यान, कार भरधाव वेगात टोल नाक्यावरून जात असताना कारच्या चालकाचे कार वरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्यालगतच्या फूटपाथवर जाऊन आदळली. या फूटपाथवर मातीची भांडी विकणाऱ्या बंजारा कुटुंबातील 9 लोक गाढ झोपेत होत. या लोकांना कारने चिरडले. भीषण अशा या अपघातात ही लोक गंभीररित्या चिरडले गेले. यात 7 जणांची प्रकृती गंभीर आहे. तर एक महिला आणि एका पुरुषाचा मृत्यू झाला आहे. सीताराम बाबुलाल बागडिया (वय 30) व कांतीबाई गजोड बागडिया (वय 42) असे मयताचे नाव आहे. तर कविता सीताराम बागडिया, बलकू सीताराम बागडिया, हसीना सीताराम बागडिया, सकीना सीताराम बागडिया, हनुमान खजोड बागडिया, विक्रम खजोड बागडिया, पानबाई मानसिंग बावरिया असे जखमींची नावे आहे.

कार चालकासह 6 जणांना अटक

या प्रकरणी पोलिसांनी कर चालक भूषण लांजेवारसह 6 जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये चालक भूषण लांजेवार, वंश राजू झाडे, सन्मय दिगंबर पात्रीकर, अथर्व बानाईत, ऋषिकेश धनंजय चौबे, अथर्व मोगरे या तरुणांचा समावेश आहे. वंश याच्या वाढदिवसाची पार्टी करुन हे सर्व आरोपी मद्यधुंद अवस्थेत होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.