Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पोट फुगणे आणि गॅसचा त्रास होत असेल तर करा ' ही ' योगासने, होतील समस्या दूर

पोट फुगणे आणि गॅसचा त्रास होत असेल तर करा ' ही ' योगासने, होतील समस्या दूर 


योगाभ्यासाचा दैनंदिन दिनचर्येत समावेश केल्यास शरीर निरोगी राहते. पण तुम्ही नियमित योग करत नसाल तर पोट फुगणे, अॅसिडिटी, गॅस आणि अशा प्रकारच्या अनेक समस्या होऊ लागतात. तुम्हाला माहिती आहे का या सगळ्या समस्या योगासने केल्यामुळे दूर होतात. हो तुम्ही अगदी बरोबर ऐकले आहे. काही प्रकारची योगासने केल्यामुळे या समस्या दूर होतात. पण ही योगासने कोणती चला जाणून घेऊया...

अपनासन

अपनासन हे आसान केल्याने पोटातील गॅसची समस्या दूर होते. पण हे आसन कसे करावे? हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम पाठीवर झोपा. नंतर हातांनी गुडघे धरून छातीजवळ आणा. तसेच डोके उचलून गुडघ्यावर ठेवावे. हे आसन १०-२० वेळा केल्यास गॅसच्या समस्येपासून आराम मिळतो.

सेतुब्धा सर्वंगासन

या आसनाच्या साहाय्याने रक्तप्रवाह सुधारला जातो. ज्यामुळे सूज येण्याची समस्या दूर होते. हे आसन करण्यासाठी योगा मॅटवर पाठीवर झोपून पाय गुडघ्याजवळ वाकवा. आपले हात जमिनीवर ठेवा. आता कंबर आणि नितंब उचलून शरीराचे सर्व वजन खांद्यावर आणण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हात जमिनीवर ठेवावेत. थोडा वेळ जमिनीवर पडून राहा. ब्रिज पोझची पुनारावृत्ती करा. शरीराचा आकार पुलासारखा होतो. म्हणूनच याला ब्रिज पोज असेही म्हणतात. हे आसन तुम्ही अनेकवेळा करू शकता. या आसनामुळे पोटाशी संबंधीत आजार कमी होतात.

बाळासन
बाळासनाला चाइल्ड पोज असेही म्हणतात. ही पोझ करण्यासाठी तुम्हाला लहान मुलाप्रमाणे पोज द्यावी लागते. गॅस आणि सूज येण्याची समस्या दूर करण्यासाठी हे खूप जुने आणि चांगले योगासन आहे. हे करण्यासाठी, योगा मॅटवर पाठीवर झोपा. नंतर पाय उचलून गुडघ्याजवळ वाकवून छातीजवळ घ्यावेत. पायाचे तळवे थेट छताच्या दिशेने आहेत की नाहीयाची खात्री करा. तसेच मुलाच्या झोपण्याच्या स्थितीप्रमाणे दोन्ही पायांमध्ये अंतर असावे.
उत्तानासन

उत्तानासनाचा सरावही अतिशय सोपा आहे. हे करण्यासाठी, सरळ उभे रहा. नंतर कंबरेवरून वाकताना हात जमिनीवर ठेवा. यावेळी आपले गुडघे वाकले जाऊ नयेत याची काळजी घ्यावी. पाय सरळ ठेवा.

पश्चिमोत्तानासन
पश्चिमोत्तानासन केल्याने पाठीचा खालचा भाग ताणला जातो आणि पाठदुखीदूर होते. यासोबतच या योगासनामुळे पोटाची चरबी कमी होण्यास ही मदत होते. या योगासनामुळे पोटात गॅस आणि सूज येण्यामुळे होणाऱ्या अस्वस्थतेपासून आराम मिळतो.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.