Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खाताखाता आला खोकला आणि शिंक, शरीराबाहेर आलं आतडं; पण कसं?

खाताखाता आला खोकला आणि शिंक, शरीराबाहेर आलं आतडं; पण कसं?

नवी दिल्ली : खोकला, शिंक तसं सामान्य. खोकला आल्यास तोंडातून थुंकीचे थेंब बाहेर पडणं, उलटी होणं, शिंक आल्यावर नाकातून सर्दी बाहेर पडणं हे तुम्ही पाहिलं असेल. पण खोकला आणि शिंक आल्याने शरीराच्या आतील एखादा अवयव शरीराबाहेर पडल्याचं तुम्ही कधी ऐकलं तरी होतं का? एका व्यक्तीच्या बाबतीत ही भयंकर घटना घडली आहे. त्याला खोकला आणि शिंक आली आणि त्याच्या पोटातील आतडं शरीराबारे आलं.

अमेरिकेतील हे शॉकिंग प्रकरण आहे. 63 वर्षांची ही व्यक्ती आपल्या पत्नीसोबत फ्लोरिडातील एका रेस्टॉरंटमध्ये गेली होती. खाताखाता तिला खोकला आला आणि शिंक आली. त्यानंतर त्याला अचानक पोटाजवळ ओलसरपणा जाणवला, वेदनाही होऊ लागल्या. त्याने शर्ट वर करून पाहिलं तर त्याला धक्काच बसला. पोट फाडून पोटाच्या आतील आतडं बाहेर आलं होतं.

आतडं शरीराबाहेर कसं आलं?

या व्यक्तीच्या पोटाची शस्त्रक्रिया झाली होती. ज्या दिवशी हे घडलं त्या दिवशी सकाळीच डॉक्टरांनी त्याच्या पोटाचे टाके काढले होते. हॉस्पिटलमधून घरी गेल्यानंतर ही व्यक्ती पत्नीसह खाण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये गेली. तिथं त्याला खोकला आला, शिंक आली आणि त्यानंतर पोटावरील टाके फाटले आणि त्यातून आतडं बाहेर आलं.

सुदैवाने फार रक्तस्राव झाला नाही. व्यक्तीला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. त्याच्या पोटातून बाहेर आलेलं आतडं पुन्हा पोटात टाकून टाके घालण्यात आले. रुग्णालयात सहा दिवसांच्या मुक्कामानंतर तो घरी परतला. कोणतीही गुंतागुंत न होता बरा झाला. त्याला डिस्जार्च देण्यात आला.

100 पैकी 3 अशी प्रकरणं

अमेरिकन जर्नल ऑफ मेडिकल केस रिपोर्ट्समध्ये हे अनोखं प्रकरण प्रसिद्ध करण्यात आलं आहे. ही स्थिती Dehiscence असल्याचं मानलं जातं, ज्यामध्ये शस्त्रक्रियेची जखम पुन्हा उघडते. ओटीपोटात आणि ओटीपोटावर शस्त्रक्रिया करणाऱ्या 100 पैकी तीन जणांमध्ये हे घडते. वृद्ध रुग्णांमध्ये हे किंचित जास्त सामान्य आहे.

शिंक, खोकल्याने मोडू शकतं हाड?

साधी शिंक आणि खोकलाही हाडं मोडण्यासाठी कारणीभूत ठरू शकतं. असं तेव्हाच होऊ शकतं, जेव्हा तुम्हाला ऑस्टिओपोरोसिस असेल. ऑस्टिओपोरोसिस हा असा एक आजार आहे जो हाडं कमकुवत करतो. निरोगी हाडामध्ये मधमाशीच्या पोळ्यासारखी लहान लहान छिद्रं असतात. या आजारात या छिद्रांचा आकार वाढतो. म्हणजेच, हाडांची घनता कमी होते, परिणामी हाडं पातळ आणि कमकुवत होतात आणि हाडं मोडण्याचा धोका वाढतो.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.