Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगवी खून प्रकरणात आणखी दोन आरोपींना अटक

सांगवी खून प्रकरणात आणखी दोन आरोपींना अटक

सांगवी येथे पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगार दीपक कदम याचा बुधवारी (दि.29) गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. या प्रकरणात सांगवी पोलिसांनी आणखी दोन आरोपींना अटक केली आहे. अटक आरोपींची संख्या आता तीन वर गेली असून अमन राजेंद्र गिल (वय 18 रा. नवी सांगवी) सुजल राजेंद्र गिल, (वय 19 रा. नवी सांगवी), सौरभ गोकुळ घुटे, (वय 22 रा. जुनी सांगवी) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मयत दीपक हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी खुनाच्या प्रयत्नाचा एक गुन्हा दाखल आहे. दीपक आणि अमन हे मित्र होते. 20 दिवसांपूर्वी त्यांच्यात भांडण झाले होते. यावेळी मयत दीपक याने सुजल व अमन यांना धमकावले होते याचा राग अमनच्या मनात होता.

या रागातून बुधवारी रात्री नवी सांगवी मधील माहेश्वरी चौक येथील इंद्रप्रस्थ सोसायटी समोरील मुख्य रस्त्यावर आरोपींनी दीपक याच्यावर गोळ्या झाडल्या. दिपकच्या चेहर्‍यावर दोन गोळ्या लागल्या. त्याला तात्काळ उपचारासाठी औंध येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

संगवी पोलिसांनी गुरुवारी अमन ला तर शुक्रवारी सुजल व सौरभ यांना अटक केली आहे. यातील आरोपी अमन गील याच्यावरही एक गुन्हा दाखल आहे.अमन ला 4 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे,तर इतर ओडन आरोपींना आज (शनिवारी) न्यायालया समोर उभा केले जाणार आहे.

ही कामगिरी सांगवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे, सहायक पोलीस निरीक्षक तानाजी भोगम, पोलीस उप निरीक्षक ताकभाते, किरण कणसे, पोलीस अंमलदार पोलीस हवालदार प्रकाश शिंदे, विवेक गायकवाड, विजय मोरे, प्रमोद गोडे, विनोद साळवे, राजेंद्र शिरसाट, नितीन काळे, विनायक डोळस, पोलीस नाईक प्रवीण पाटील, पोलीस अमलदार आकाश खंडागळे, विजय पाटील, निलेश शिंगोटे, राजाराम माने, सुहास डंगारे यांनी केली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.