Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सैराट फेम रींकूशी लग्न करायचंय तर 'ही ' अट करावी लागेल पूर्ण :, वडिलांना असा हवा आहे जावंई

सैराट फेम रींकूशी लग्न करायचंय तर 'ही ' अट करावी लागेल पूर्ण :, वडिलांना असा हवा आहे जावंई 


तमाम मराठी प्रेक्षकांना 'सैराट' करणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु . अगदी कमी वयात रिंकूने मराठी कलाविश्वात पदार्पण केलं आणि पाहता पाहता या इंडस्ट्रीमध्ये  तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं. आजवर रिंकूने अनेक गाजलेल्या सिनेमात काम केलं आहे. त्यामुळे सहाजिकच तिचा चाहतावर्ग सुद्धा तितकाच मोठा आहे. यात अनेक जण रिंकूच्या लव्हलाइफविषयी किंवा तिच्या लग्नाविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. यामध्येच आता तिच्या वडिलांनी त्यांना नेमका कसा जावई हवाय हे सांगितलं आहे.

अलिकडेच रिंकू आणि तिच्या वडिलांनी फदर्स डे निमित्त राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या होणाऱ्या जावयाविषयीच्या अपेक्षा सांगितल्या. "ती ठरवेल तो चालेल. पण, तिने सांगितल्यानंतर मग आम्ही त्यावर निर्णय घेऊ", असं रिंकूचे वडील म्हणाले. त्यावर, "मला हा मुलगा आवडतो असं मी म्हटलं तर लग्नासाठी होकार द्याल का?"असा प्रश्न रिंकूने विचारला. त्यावर, "नाही तसं नाही," असं ते म्हणाले.

पुढे ते म्हणतात, "ज्या पद्धतीने आम्ही तिला स्वातंत्र्य दिलं त्याच पद्धतीने त्यानेही तिला द्यावं. नाही तर मग इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको हे असं नकोय. हे क्षेत्रच असं आहे की, प्रत्येक ठिकाणी तिला जावंच लागतं. या गोष्टी ज्याला कळल्या तोच तिला समजून घेऊ शकतो. असा मुलगा असेल तर आमची काहीच अडचण नाही." दरम्यान, आजही रिंकूला अकलूजमध्ये अभिनेत्रीपेक्षा राजगुरु सरांची लेक याच नावाने लोक ओळखतात, असंही रिंकूने सांगितलं. विशेष म्हणजे रिंकू आज मराठीतली सुपरस्टार असूनही तिचे कुटुंबीय अत्यंत साधे असल्याचं दिसून येतं.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.