Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

घराच्या सीलिंगमधून येत होता विचित्र आवाज, छत तोडल्यावर दिसलं अंगावर काटा आणणारं; व्हिडिओ पहा

घराच्या सीलिंगमधून येत होता विचित्र आवाज, छत तोडल्यावर दिसलं अंगावर काटा आणणारं; व्हिडिओ पहा

नवी दिल्ली : अनेकदा घरातून विचित्र आवाज येण्याच्या घटना समोर येत असतात. घरातून अनेक अजब गजब गोष्टीही सापडतात. अशीच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये घरातील सीलिंगमधून खूप भयानक प्रकार पहायला मिळाला.

या घटनेचा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. एका घरातील सीलिंगमधून विचित्र आवाज येत होता. त्यानंतर घराची सीलिंक खोलून पाहिलं तेव्हा खूपच धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारा प्रकार समोर आला.

घटनेचा समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, घराची छतातून आवाज आल्यावर घरातील लोकांनी छत खोलून पाहिली. तेव्हा त्यांना मोठं मधमाश्यांचं जाळं दिसलं. 180,000 मधमाश्या घराच्या छताच्या आत होत्या. या मधमाश्या अनेक वर्षापासून या प्लास्टवुडच्या छताच्या आत घर करुन राहत होत्या.

बीबीसीच्या रिपोर्टनुसार, घरातील मालकाच्या नातू-नातीने घरातील छतावर काहीतरी भिनभिन करत असल्याचा आवाज ऐकला. मग त्यांनी छर खोलून पाहिल्यावर मधमाश्यांच्या पोळ्याचं हे दृश्य दिसलं. हनी कंपनीला हे मधमाश्यांचं जाळ काढण्यासाठी बोलावण्यात आलं.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.