Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खराब रस्त्यावर टोल वसूल करणं योग्य नाही :, नितीन गडकरीनीं स्पष्टचं सांगीतलं

खराब रस्त्यावर टोल वसूल करणं योग्य नाही :, नितीन गडकरीनीं स्पष्टचं सांगीतलं 


दिल्ली:  खराब रस्त्यांवर देखील प्रवाशांना टोल भरावा लागतो. यावरून प्रवाशांमध्ये नाराजी असल्याचं पाहायला मिळतं. आता याच मुद्द्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वाची टिप्पणी केली आहे. ते म्हणालेत की, 'जर चांगले रस्ते आणि सेवा दिली जात नसेल तर टोल टॅक्स वसूल करणे चुकीचं आहे.' 
नितीन गडकरी यांनी टोल नाक्यावर लागणाऱ्या रांगांबाबत चिंता व्यक्त केली आहे. सॅटेलाईट बेस्ड टोलिंगवर आयोजित वर्कशॉपच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ते टोल टॅक्सबाबत मोकळेपणाने बोलल्याचं पाहायला मिळालं. सूत्रांच्या माहितीनुसार, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण म्हणजे NHAI नव्या व्यवस्थेअंतर्गत टोल गेट्स हटवण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.
जर चांगल्या सुविधा दिल्या जात नसतील तर त्यांनी टोल आकारला नाही पाहिजे. जेव्हा कोणत्या रस्त्याची स्थिती चांगली नसते तेव्हा मला त्याच्या तक्रारी मिळत असतात. अनेक जण सोशल मिडियावर मला टॅग करून यासंदर्भात कळवत असतात, असं नितीन गडकरी म्हणाले आहेत.
ज्या ठिकाणी खूप चांगले रस्ते बनत आहेत, त्याठिकाणी प्रवाशांनी शुल्क द्यायला हवा. जर तुम्ही खड्डे आणि चिखलाच्या रस्त्यासाठी देखील पैसे आकारत असाल तर चुकीचं आहे. तुम्ही असं करत असाल तर लोक नक्कीच नाराज होतील आणि त्यांच्या नाराजीचा सामना त्यांना करावा लागेल, असं नितीन गडकरी म्हणाले.

टोल नाक्यावर रांगेत उभे राहणाऱ्या लोकांचं दु:ख राष्ट्रीय राजमार्ज एजेन्सिच्या अधिकाऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे. शिवाय, तक्रार दाखल करणे आणि त्याचे निवारण करणे याच्यातील वेळ कमी व्हायला पाहिजे अशा प्रकारचे मेकॅनिझम तयार केलं गेलं पाहिजे, असं गडकरी म्हणाले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.