Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सपेन्स संपला! नितीश कुमार, चंद्राबाबू, अखेर यांनी ' हा ' निर्णय घेतला

सपेन्स संपला! नितीश कुमार, चंद्राबाबू, अखेर यांनी ' हा ' निर्णय घेतला 


लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर एनडीएतील मित्रपक्ष असलेल्या टीडीपी आणि जेडीयूने भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी पाठिंब्याचे पत्र सोपवले आहे. चंद्राबाबू नायुडू आणि नीतीश कुमार यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे नरेंद्र मोदी आणि भाजपला मोठा दिलासा मिळाला असणार हे नक्की आहे.

कारण काल लागलेल्या निकालात भाजपसह एनडीएला 293 जागा मिळाल्या आहेत. तर इंडिया आघाडीला 233 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे जर इंडिया आघाडीने साद घातली तर चंद्राबाबू आणि नीतीश कुमार त्यांचा इतिहास पाहता पलटी मारण्याची शक्यता नाकारता येत नाही.
काल झालेल्या मतमोजणीमध्ये भाजपला 240 तर एनडीएला 293 जागा मिळाल्या आहेत. दुसरीकडे काँग्रेसला 99 तर इंडिया आघाडीला 234 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे बहुमतासाठी इंडिया आघाडीला लागणारी खासदारांची संख्या जास्त नाही. अशात इंडिया आघाडीकडूनही फोडाफोडीचे राजकारण होऊ शकते. हे टाळण्यासाठी भाजप सावध पाऊले उचलत आहे.

दरम्यान एनडीएची आज दिल्लीमध्ये बैठक होणार आहे. या बैठकीनंतर एनडीएचे नेते राष्ट्रपतींकडे सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्याकडे औपचारिक राजीनाम दिला आहे. दरम्यान राष्ट्रपतींनी नुकतीच 17 वी लोकसभा भंग केली आहे. त्यामुळे लवकरच नवे सरकार अस्तित्वात येणार आहे.
आज दिल्लीतील एनडीएच्या बैठकीत महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचे नेतेही उपस्थित होते. महाराष्ट्रात शिवसेनेने सात तर राष्ट्रवादीने एक जागा जिंकली आहे. एनडीएमध्ये तेलुगु देसम पक्ष हा भाजपनंतरचा दुसरा सर्वात मोठा घटक पक्ष आहे. त्याचे ज्येष्ठ नेते कनकमेडला रवींद्र कुमार यांनी आधीच स्पष्ट केले आहे की, आंध्र प्रदेशातील भाजप आणि जनसेना यांच्यासोबतचा आम्ही निवडणुकी पूर्वी युती केली होती. त्यामुळे आम्ही एनडीए मध्येच राहणार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.