Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आंब्याच्या पेट्यातून दारुची तस्करी

आंब्याच्या पेट्यातून दारुची तस्करी


पुणे : गोवा या ठिकाणी दारुवरील टॅक्स कमी असल्याने याठिकाणी स्वस्तात दारु मिळते. मात्र, गोव्यातून दारु इतर राज्यात नेण्यास परवानगी नसताना पर्यटक चर्चारुन दारु घेऊन जातात. गोव्यातून छुप्या पद्धतीने दारुची तस्करी होत असते. गोव्यातून अवैधरित्या नगर जिल्ह्यात दारु नेत असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दौंड विभागाच्या पथकाने कारवाई केली आहे.

बारामतीच्या मोरगाव सुपे मार्गावरील मूर्ती गावच्या हद्दीत उत्पादन शुल्क विभागानै ही कारवाई केली. मूर्ती गावच्या हद्दीत हॉटेल सानिकाजवळ एक संशयित बोर्लेरो पिकअप वाहुन आणि हंडाई कंपनीची क्रेटा गाड़ी पथकाने थांबवली. तसेच, वाहन चालकाकडे वाहनामध्ये काय आहे अशी विचारणा केली. त्यांच्याकडे चौकशी केली असता दोन्ही वाहन चालकांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला घेऊन तपासणी केली असता आंब्याच्या रिकाम्या लकडी पेटांच्या आड गोवा राज्यात तयार केलेली व विक्री परवानगी नसलेली विदेशी दारु सापडली. त्यामध्ये तब्बल 12 लाख 61 हजार रुपयांची दारु, दोन चारचाकी वाहने, दोन मोबाईल असा एकूण 30 लाख 71 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अहमदनगर जिल्ह्यात ही दारु विक्री करण्याच्या उद्देशाने परराज्यातून चोरुन आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहेत. आरोपींविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65 चा 80, 81, 83, 90 व 108 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.