Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

' महालक्ष्मी एक्सप्रेस ' मध्ये प्रसूती, मुस्लिम दाम्पत्यांनी मुलीचं नाव ठेवले महालक्ष्मी!

' महालक्ष्मी एक्सप्रेस ' मध्ये प्रसूती, मुस्लिम दाम्पत्यांनी मुलीचं नाव ठेवले महालक्ष्मी!


कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये ६ जून रोजी ठाणे येथील फातिमा खातून या महिलेने एका मुलीला जन्म दिला. तिने आणि तिचे पती तय्यब यांनी मुलीचे नाव रेल्वेच्या नावावरूनच महालक्ष्मी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तिरुपतीहून कोल्हापुरातील अंबाबाईच्या दर्शनाला निघालेल्या काही सहप्रवाशांनी रेल्वेत मुलीचा जन्म म्हणजे देवीचेचं दर्शन झाले, असं म्हटलं होतं, म्हणून मुलीचे नाव महालक्ष्मी ठेवल्याचे खातून दाम्पत्याने म्हटले आहे.

६ जून रोजी सकाळी कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या फातिमा खातून (३१) यांना प्रसूती वेदना सुरू झाल्या. लोणावळा स्टेशनवर पोहोचल्यावर फातिमा यांनी पती तय्यब यांना वेदना होत असल्याचे सांगितले. त्‍या ट्रेनच्या टॉयलेटमध्ये गेल्‍या. बराच वेळ ती परत आली नसल्याने पाहण्यासाठी तय्यब टॉयलेटकडे गेला असता तिने मुलीला जन्म दिल्याचे समजले. रेल्वेमध्ये उपस्थित असलेल्या इतर महिला प्रवाशांनी फातिमाला मदत केली. रेल्वे स्टेशनवर पोहोचताच फातिमा आणि बाळाला ट्रेनमधून उतरवून रुग्णालयात नेण्यात आले. रेल्वे पोलिसांनी रुग्णालयाला आधीच कळवले होते. रूग्णालयात फातिमा आणि तिच्या मुलीसाठी आवश्यक व्यवस्था केली होती. फातिमा यांना तीन दिवसांनी डिस्चार्ज देण्यात आला.
…म्हणून मुलीचे नाव ठेवले महालक्ष्मी

तय्यबने सांगितले की, पत्नीची प्रसूतीची तारीख २० जून होती. त्यांना तीन मुलगे आहेत. तिरुपतीहून कोल्हापुरला जाणाऱ्या काही प्रवाशांनी सांगितले की, मुलीच्या जन्माने त्यांना लक्ष्मीचे दर्शन झाले. म्हणून मुलीचे नाव महालक्ष्मी ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे त्याने सांगितले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.