Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धक्कादायक! पुण्यात अल्पवयीन मुलीवर वडील, चुलता व चुलत भावाने केला बलात्कार! पुण्यात खळबळ

धक्कादायक! पुण्यात अल्पवयीन मुलीवर वडील, चुलता व चुलत भावाने केला बलात्कार! पुण्यात खळबळ 


पुण्यात पुन्हा एक अल्पवयीन मुलगी आपल्याच वडील आणि नातेवाईकांच्या वासनेची शिकार झाली. मांजरी येथे आपल्याच मुलीवर वडील, चुलता व चुलत भावाने बलात्कार केल्याचे उघड झाले आहे. या घटनेने खळबळ उडाली असून या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना जुलै २०२२ ते १० जून २०२४ दरम्यान, घडली. पीडितेने तिच्यावर बेतलेला प्रकार आईला सांगितल्यावर ही घटना उघडकीस आली. दरम्यान, आईने पोलिसांकडे जात या प्रकरणी वडील, चुलत भाऊ व काका विरोधात तक्रार दिली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पडितेचे कुटुंब हे परप्रांतीय आहे. ते रोजगाराच्या शोधत पुण्यात आले होते. पीडित मुलगी ही १३ वर्षांची आहे. ती तिची आई, वडील, चुलत भाऊ व काका असे सर्व जण मांजरी येथील घुले नगर येथे भाड्याने राहत आहे. दरम्यान, जुलै २०२२ मधे मुलगी घरातील वरच्या मजल्यावर एकटी असतांना तिच्या चुलत भावाने 'चल प्यार करेंगे' म्हणत तिच्यावर अतिप्रसंगत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने याला नकार दिल्याने त्याने त्याच्या जवळील धार धार हत्याराची भीती तिला दाखवत जीवे मारण्याची धमकी देत तिला कपडे काढण्यास सांगितले. यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान, मुलीला त्रास झाल्याने तिने आरडा ओरडा केला. यानंतर तिने तेथून पळ काढला. ही गोष्ट जर कुणाला सांगितली तर ठार मारण्याची धमकी चुलत भावाने तिला दिली होती.

या वर्षी जानेवारी महिन्यात पीडित मुलगी ही रात्री घरात झोपली असतांना तिचा चुलता तिच्या जवळ आला. त्याने अंथरुणामध्ये शिरून तिचे कपडे काढले व तिच्यावर बलात्कार केला. काही दिवसांनी मुलीची आई गावी गेल्यावर तिच्या वडिलांनी जबरदस्तीने तिचे चुंबन घेत तिच्यावर देखील बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. पीडित मुलीने वडिलांना विरोध केला. मात्र, वडिलांनी तिला मारहाण करत तिच्यावर अत्याचार केले. अखेर तिची आई गाववरून आल्यावर तिने तिच्यावर बेतलेला प्रसंग आईला सांगितला यानंतर आईने पीडितेसह थेट पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. हे सर्व जण पीडितेला रोज त्रास देत असल्याचे देखील तिने केलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.